लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : विभागीय मंडळ कार्यकक्षेतील सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांना सरलची माहिती तपासून सदर माहिती अपडेट करण्याच्या सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी डी. के. इंगोले यांनी दिल्या आहेत.महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे दहावी बारावीतील बोगस विद्यार्थ्यांना आळा घालण्यासाठी संगणकीय प्रणालीत माहिती भरून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापुर्वी दहावी बारावीतील विद्यार्थ्यांची माहिती लेखी स्वरूपात होती. परंतु यात बदल करून सदर माहिती थेट सरलमध्ये भरण्याच्या सूचना संबधित शाळा व महाविद्यलायांना देण्यात आल्याआहेत. फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी बारावीतील विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे अप्लीकेशन फॉर्म सरल डाटावरून भरू घेण्यात यावेत अशा सूचना विभागीय सचिव मंडळ औरंबाद यांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा कनिष्ठ विद्यालयातील मुख्याध्यापक व प्राचार्यांना शासन निर्णयानुसार दहावी व बारावीतील मंडळाची आवेदनपत्र सरल डाटावरून आॅटो पाप्यूलेट पद्धतीने घेण्याच्या सूचना विभागीय मंडळाने दिल्या आहेत. त्यामुळे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयता दहावी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षांची आवेदनपत्र ही सरल डाटावरून भरून घ्यावयाची आहेत. १ सप्टेंबर पर्यंत ही प्रक्रिया पार पाडण्याच्या सूचनाही शिक्षणाधिकारी इंगोले यांनी दिल्या होत्या. ही कामे पार पाडताना काही अडचणी आल्यास हेल्पलाईनवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले. मोबाईल हेल्पलाईनबाबत आवेदनपत्रे आॅनलाईन सादर करण्याच्या तारखां संदर्भात संबधितांना कळविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे किती महाविद्यलय व शाळांनी माहिती भरली याचा आढावा शिक्षणाधिकारी घेणार आहेत.सरल प्रणाली अंतर्गत विविध पोर्टलवर माहिती भरून ती अतिम करण्याबाबत विभागीय सचिव, विभागी मंडळ औरंबाद यांच्या सूचना आल्या आहेत. त्या अनुषंगाने विभागीय मंडळ कार्यकक्षेतील मुख्याध्यापक प्राचार्यांना सदर माहिती सरलमध्ये अपडेट करून घेणे बंधनकारक असल्याचे शिक्षणाधिकाºयांनी सांगितले.
सरल डाटावर परीक्षेचे आवेदनपत्र भरा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 1:31 AM