लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : गेल्या अनेक वर्षांपासून रोहयोत वन विभागाकडे कार्यरत असलेल्या मजुरांना शासन सेवेत कायम करण्यासाठी विभागीय वन अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविण्यात आला आहे. ३ जुलै रोजी हा अहवाल देण्यास सांगितले होते.मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, बीड, हिंगोली उस्मानाबाद व परभणी या जिल्ह्यातील विभागीय वन अधिकाºयांमार्फत हा अहवाल मागविला आहे. मुख्य वन संरक्षक प्रशासकीय अधिकारी यांनी हे आदेश काढले आहेत. रोजगार हमी योजनेत अंशत: कालावधीत काम करणाºया मजुरांबाबत शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचा दाखला देत ही माहिती मागविली आहे. वन विभाग सध्या ही माहिती गोळा करीत असल्याचे चित्र आहे.
अखेर शासनाने मागविली वनमजुरांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 12:28 AM