लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या मुलींच्या नवीन वसतिगृहाच्या बांधकामाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. नियोजित पहिल्याच जागेत बहुविध प्रशालेच्या प्रांगणात इमारतीचे बांधकाम केले जात आहे. शैक्षणिक दृष्टिकोणातून या वसतिगृहामुळे अनेक मुलींना फायदा होणार आहे. १०० मुलींचे हे वसतिगृह आहे.शैक्षणिकदृष्ट्या अप्रगत हिंगोली गटात मुलींच्या वसतिगृहास मान्यता मिळाली आहे. या वसतिगृहाच्या इमारत बांधकामाची निविदा राज्यस्तरावरून करण्यात आली असून सदर बांधकामाचे पर्यवेक्षण पीएमसीद्वारे केले जाणार आहे. मुलींच्या शिक्षणात हिंगोलीचा सामावेश अप्रगत गटात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मुलींना वसतिगृहात प्रवेशित करून त्यांना शिक्षण देण्याची धडपड शासनाकडून केली जात आहे. त्या अनुषंगाने नवीन इमातीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. जि. प. बहुविध प्रशालेच्या प्रांगणातील नियोजित जागेत ही इमारत उभी राहणार आहे.४० मी. बाय १९ मी. जागेत इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे.काही महिन्यापुर्वी वसतिगृह इमारतीच्या बांधकामास सुरूवात झाली होती. परंतु बांधकामास कोणाची परवानगी घेण्यात आली. तसेच जागा निश्चित कोणी केली. सदर कामाचा ठराव घेण्यात आला होता का? यासह विविध प्रश्नांमुळे नवीन इमारतीच्या बांधकाचा प्रश्न निर्माण झाला होता. शिवाय बांधकामाचा मुद्दा जिल्हा परिषदेतही चांगलाच गाजला होता. विशेष म्हणजे याबाबत प्रशासकीय यंत्रणा मात्र काही सांगण्यास तयार नव्हती. अखेर जून महिन्यात बांधकामास सुरूवात करण्यात आली आहे. बांधकामावरही राज्यस्तरावरूनच नियंत्रण असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.निधी परत जाण्याच्या भीतीने प्रशासनाकडूनच मुलींच्या वसतिगृहाचे काम जि. प. शाळेच्या मैदानावर जागा निश्चित न करताच केले जात आहे. ही घाई कशामुळे? असा प्रश्न स्थायी समितीच्या सभागृहात सदस्यांनी पाच महिन्यांपूर्वी उपस्थित केला होता. त्यामुळे या वसतिगृहाचा मुद्दा चर्चेचाविषय बनला होता. विशेष म्हणजे मुलींचे वसतिगृह असल्याने ते लोकवस्तीत उभारले जावे, अशी प्रशासनाची भूमिका होती. त्यामुळे हिंगोली येथील जि. प. बहुविध प्रशालेच्या मैदानावरील जागा निश्चित करून बांधकाम केले जात होते.
अखेर बांधकामास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:32 AM