शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

अखेर ‘ते’ वानर वन विभागाच्या पिंजऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 12:52 AM

वसमत तालुक्यातील कौठा येथे मागील चार दिवसांपासून धुमाकूळ घालत १६ जणांना जखमी करणाºया पिसाळलेल्या नर वानराला अखेर पिंजºयात कैद करण्यात वन विभाग व प्राणीमित्रांना यश आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककौठा : वसमत तालुक्यातील कौठा येथे मागील चार दिवसांपासून धुमाकूळ घालत १६ जणांना जखमी करणाºया पिसाळलेल्या नर वानराला अखेर पिंजºयात कैद करण्यात वन विभाग व प्राणीमित्रांना यश आले आहे.सदरील वानर पकडल्याने गावकºयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. कौठा येथे चार दिवसांपासून या वानराने हैराण केले होते. सुरुवातीला फक्त लहान मुलांच्या अंगावर धावून जाण्यानंतर अतिशय आक्रमक होऊन महिला, पुरुषांवर धावून जाणे, चावणे, ओरबाडणे व ढकलून देणे अशा प्रकारे हल्ले करू लागले. यात तीन दिवसांत १५ ग्रामस्थ जखमी झाले होते. वानराच्या भीतीने मंदिरात जाण्यासही ग्रामस्थ घाबरत होते, तर महिला व मुले घराबाहेर पडण्यास भीत होते. याबाबत गांवकºयांनी वसमत येथील वनविभागाच्या अधिकाºयांशी संपर्क साधून वानराचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. त्यामुळे १७ जून रोजी वनविभागाच्या कर्मचाºयांनी गावात येवून या वानराला गावाच्या बाहेर हुसकावून लावले. परंतु त्याने पुन्हा गावात येऊन धुमाकूळ घालत वैजनाथ खराटे यांना गंभीर जखमी केले. याबाबत लोकमत ने १८ जून रोजी वृत्त प्रकाशित करून वनविभागाकडून ठोस कार्यवाहीची मागणी केली होती. १८ जून रोजी पुन्हा दिवसभर सदरील वानर गावातच होते. सायंकाळी ४.३० वा. वनविभागाचे वनपाल पवार, वनरक्षक आयनले व कर्मचारी व औरंगाबाद जिल्ह्यातील वन्यजीव प्राणी मित्र समाधान गिरी व त्यांचे पथक पिंजºयासह दाखल झाले. वानर बसलेल्या घराजवळ त्यांनी पिंजरा लावून त्यात खाद्यपदार्थ टाकले. थोड्याच वेळात वानर पिंजºयात शिरताच लोखंडी पिंजºयाचे दार बंद करण्यात आले. वानर पिंजºयात अडकताच जमलेल्या गावकºयांनी सुटकेचा श्वास घेतला.वानराच्या हल्ल्यात जखमी होऊन हात फ्रॅक्चर झालेले किशनराव देशमुख म्हणाले की, वानराच्या हल्ल्याने आम्ही अतिशय घाबरलो होतो. मंदिरात नित्यनेमाप्रमाणे पूजेला जायचीही भीती वाटत होती. पण आता वानर पकडल्या गेल्यामुळे भीती नाहीशी झाली आहे. तसेच वानराला पकडणारे प्राणीमित्र समाधान गिरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सदरील वानराच्या डोक्याला जखम झालेली आहे. यामुळे ते पिसाळून क्रूर बनले. आता या वानरास उपचार करून माहूर किंवा किनवट येथील जंगलात सोडण्यात येणार आहे.

टॅग्स :forestजंगलMonkeyमाकड