लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जि. प. समाजकल्याण विभागाकडून मागील दोन वर्षांत आंतरजातीय विवाहित २१ जोडप्यांना प्रत्येकी ५० हजार रूपये प्रमाणे अर्थसहाय्य करण्यात आले आहे. २०१७-१८ मध्ये १५ तर २०१८-१९ या वर्षात ६ एकूण २१ जोडप्यांना योजने अंतर्गत लाभ देण्यात आला आहे. सध्या अर्ज प्रक्रियेसाठी लाभार्थी जोडप्यांना आवाहन जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे.समाजात सवर्ण आणि मागासवर्गीय असा भेदभाव दूर व्हावा व या दृष्टिकोनातून शासनाने ही योजना सुरू केली आहे. समाजातील जातीयता नष्ट करण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न केले जातात. त्याचाच एक भाग म्हणजे आंतरजातीय विवाहित जोडप्यांना प्रोत्सहनपर रक्कम दिली जाते. पूर्वी आंतरजातीय विवाहित जोडप्यांना १५ हजार रुपये अनुदान देय होते. आता यात बदल करून शासनाने रक्कमेत वाढ केली असून आता लाभाची रक्कम ५० हजार रुपये दिली जात आहे. अशा जोडप्यांनी समाजकल्याण विभागाकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेण्यासाठी जि.प.च्या समाजकल्याण अधिकारी कार्यालयात विहित नमुन्यातील अर्ज सादर करणे आवश्यक आहे. सोबत विवाह नोंदणी दाखला, वधू-वर यांचा शाळा सोडल्याचा दाखला, जातीच्या दाखल्याच्या साक्षांकित प्रती जोडणे गरजेचे आहे. अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, असल्यास जिल्हाधिकाऱ्यांचा दाखला. आंतरजातीय विवाहाची नोंदणी संबंधित विवाह नोंदणी अधिकाºयाकडे असणे आवश्यक आहे. वधूचे वय १८ वर्ष आणि वराचे वय २१ वर्ष पूर्ण असावे तसेच योजनेचा यापुर्वी लाभ घेतलेला नसावा, यासाठी शंभर रूपयाचा बाँडपेपर, तसेच लग्नपत्रिका या प्रकारे अटी आहेत.अर्ज करण्याचे आवाहन४आंतरजातीय विवाह करणाºया जोडप्यांना प्रोत्साहान म्हणून जि. प. समाजकल्याण विभागातर्फे अर्थसहाय्य केले जाते. जातीयता नष्ट व्हावी, हा मुळ उद्देश डोळ्यासमोर ठेऊन शासनाने हा उपक्रम सुरू केला आहे. दरवर्षी समाजकल्याणकडून आंतरजातीय विवाहित जोडप्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी आवाहन केले जाते. सध्या जि. प. समाजकल्याण कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आंतरजातीय विवाहित जोडप्यांना अर्थसहाय्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 12:07 AM