शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

अतिरिक्त प्रवेशातून शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या मुख्याध्यापक व संस्थाचालकाविरोधात गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 6:14 PM

नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत तालुक्यातील कापडसिनगी येथील दोन विद्यालयात नियमबाह्य परीक्षार्थी आढळून आले होते. याप्रकरणी शिक्षण विभागाच्या चौकशीअंती शिक्षणाचा बाजार मांडणारे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे.

सेनगाव (हिंगोली ) : नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत तालुक्यातील कापडसिनगी येथील दोन विद्यालयात नियमबाह्य परीक्षार्थी आढळून आले होते. याप्रकरणी शिक्षण विभागाच्या चौकशीअंती शिक्षणाचा बाजार मांडणारे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. यावरून गटशिक्षणाधिकारी यांच्या फिर्यादीवरून दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक व संस्थाचालक पदाधिकारी अशा नऊ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दहावी परीक्षेत वयस्क व अतिरिक्त परीक्षार्थी प्रवेशाने तालुक्यातील संत रेखेबाबा विद्यालय व संत गजानन माध्यमिक विद्यालय चांगलेच चर्चेत आले. कुठल्याची भौतिक सुविधा नसताना दोन्ही विद्यालयात प्रवेश दाखविल्या व्यतिरिक्त जवळपास ३७८ परीक्षार्थी अतिरिक्त आढळून आले. यामुळे ऐनवेळी सेनगाव येथे अतिरिक्त दोन परीक्षा केंद्र स्थापन करण्यात आली. कशीबशी परीक्षा पार पडल्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी दिपक चवणे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत याची सखोल चौकशी केली. अतिदुर्गम भागातील या दोन केंद्रावर अतिरिक्त परीक्षार्थी आलेच कसे याचा शिक्षण विभागाने शोध घेतला. चौकशीअंती दोन्ही महाविद्यालयाने शासनाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. अवैधरित्या विद्यार्थ्यांना प्रवेश देत परीक्षेत पास करण्याची मोठी साखळीच यातून उघडकीस आली. 

यावरून सोमवारी रात्री उशिरा गटशिक्षणाधिकारी सिताराम जगताप यांच्या फिर्यादीवरून संत रेखेबाबा विधालयात चे मुख्याध्यापक पांडुरंग विठ्ठल कचरे ,शिक्षक पवन गौतम गायकवाड, संस्थाध्यक्ष दिपक अशोक सिरामे, उपाध्यक्ष चंद्रकांत शेषराव हराळ, सचिव अशोक सिताराम सिरामे तर संत गजानन माध्यमिक विधालयाचे मुख्याध्यापक राजकुमार पांडुरंग वाकळे, संस्थाध्यक्ष भगवान रामभाऊ लहाने, उपाध्यक्ष मंदाताई नारायण गावडे, सचिव सत्यभामा भिमराव खरात अशा एकुण नऊ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर कारेगावकर, फौजदार किशोर पोटे हे करत आहेत. मुख्याध्यापक व संस्थाचालकाविरोधात गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाexamपरीक्षाHingoli policeहिंगोली पोलीसfraudधोकेबाजी