लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : येथील शेवाळा रोडवरील चौकामागील भंगार साहित्याच्या दुकानाला दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने आग लागून तीन लाख रूपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या वाहनाने वेळीच आग आटोक्यात आणल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.भंगार व्यापारी शेख मुस्तफा यांचे भंगार सामानाचे गोडाऊन शेवाळा चौकाजवळील गल्लीत आहे. १९ मे रोजी दुपारी ३ च्या सुमारास विजेचे शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. यात दुरुस्तीचे फ्रीज भंगार साहित्य जळून खाक झाले. आग लागल्याची माहिती आखाडा बाळापूरचे पोलिस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने यंत्रणा हलविली. कळमनुरी अग्नीशामक दलाच्या वाहनास पाचारण करण्यात आले. अग्नीशामकचे कर्मचारी त्र्यंबक जाधव, मनोज व्यवहारे यांनी आग विझविली. आग आटोक्यात आली नसतरी तर नजीकची दुकाने, घरेही तिने कवेत घेतली असती. पोलीस निरीक्षक केंद्रे, म. हकीम, नागरगोजे, जमादार संजय मारके, उपसरपंच विजय बोंढारे यांच्यासह गावकरी मदत कार्यात सहभागी झाले होते.
भंगार दुकानाला आग; तीन लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 1:08 AM