हिंगोली : शहरापासून जवळ असलेल्या लिंबाळा भागातील डम्पिंग ग्राऊंडला शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास आग लागली होती. ही आग आटोक्यात आणण्याचे काम रविवारी दुपारी चार वाजेपर्यंत सुरूच होते. अखेर कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
२४ एप्रिल रोजी दुपारी चार वाजता लिंबाळा भागातील डम्पिंग ग्राऊंडला आग लागली. उन्हाची तीव्रता लक्षात घेता मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, अग्निशमन प्रमुख तथा स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांनी अग्निशमन गाड्या लगेच त्या ठिकाणी पाठविल्या. डम्पिंग ग्राऊंड परिसर हा १० एकरामध्ये आहे. आगीमध्ये केवळ कचराच जळून खाक झाला आहे. दुसरीकडे कोणतीही इजा पोहोचली नाही, असे सांगितले. शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास औंढा व कळमनुरी येथील अग्निशमन गाड्या बोलाविण्यात आल्या होत्या. २५ एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजता दोन्ही तालुक्यांच्या अग्निशमन गाड्या पाठवून देण्यात आल्या. रविवारी दुपारी चार वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते. अग्निशमन कर्मचारी शायद खाँ जानी खाँ, संजय ननवरे, शेख अमजत, नितीन पवार, बजरंग थिटे, दीपक गायकवाड यांनी डम्पिंग ग्राऊंडला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
फोटो न. २५