शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

पहिल्या हप्त्यातच अडकली घरकुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:12 AM

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाºया प्रधानमंत्री आवास योजनेत यावर्षीच्या १0४७ पैकी केवळ ३४७ जणांनाच पहिला हप्ता मिळाला आहे. यात मंजुरीच ४९३ जणांना मिळाली. त्यामुळे अनेकजण निधीची प्रतीक्षा करीत आहेत. तर गतवर्षीच्या साडेचार हजार जणांचा चौथा हप्ता अजून मिळाला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाºया प्रधानमंत्री आवास योजनेत यावर्षीच्या १0४७ पैकी केवळ ३४७ जणांनाच पहिला हप्ता मिळाला आहे. यात मंजुरीच ४९३ जणांना मिळाली. त्यामुळे अनेकजण निधीची प्रतीक्षा करीत आहेत. तर गतवर्षीच्या साडेचार हजार जणांचा चौथा हप्ता अजून मिळाला नाही.घरकुल योजनेतील रक्कम मिळत नसल्याने लाभार्थी हैराण आहेत. अनेकजण पंचायत समितीच नव्हे, जिल्हा परिषदेच्या घिरट्या घालताना दिसत आहेत. यात २0१७-१८ मध्ये प्रधानमंत्री आवासचे १0४७ तर रमाईचे ११८७ एवढे उद्दिष्ट होते. प्रधानमंत्री आवासमध्ये ५३३ कामांना मंजुरी दिली व ४८३ जणांचे जिओ टॅगिंग झाले. ३४७ जणांना पहिला तर १७ जणांना दुसरा हप्ता दिला. ४९३ जणांची खातेपडताळणी झाली. उर्वरितांचे मात्र अजून कशातच काही नाही. रमाई घरकुलमध्ये तर केवळ ३३ जणांचीच नोंदणी झाली. कामाचा पत्ता नाही. त्यामुळे लाभार्थ्यांतून होणारी ओरड रास्त असल्याचे चित्र दिसून येत आहे.२0१६-१७ चा विचार केला तर प्रधानमंत्री आवासमध्ये ३७१५ एवढे उद्दिष्ट होते. यापैकी ३४८४ जणांना मंजुरी मिळाली होती. ३३१३ जणांना पहिला हप्ता मिळाला होता. त्यापैकी केवळ एकालाच चौथा हप्ता मिळाला. यात ८७९ घरकुल पूर्ण झाल्याचे सांगितले जाते. याच वर्षातील रमाई योजनेतील १0७९ घरकुलाच्या उद्दिष्टापैकी १0४२ ला मंजुरी दिली होती. त्यापैकी ९६७ जणांना पहिला हप्ता मिळाला. १९४ जणांना तिसरा हप्ता दिला.यात २१९ कामे पूर्ण झाल्याचे सांगितले जाते. शब्री घरकुल योजनेत उद्दिष्टातील सर्व २२७ घरकुल मंजूर झाले. २२१ जणांना पहिला तर यापैकी ५८ जणांना तिसरा हप्ता दिला. ६३ कामे पूर्ण झाली. पारधी घरकुलमधील १३ कामांपैकी ५ कामे तिसºया हप्त्यापर्यंत पोहोचली. ही कामे पूर्णही झाली.अडचण : ५ हजारांपैकी ११६६ पूर्णया योजनेत २0१६-१७ चा विचार केला तर विविध योजनांत ५0३४ घरकुलांना मंजुरी दिली. यापैकी ५३७३ जिओ टॅगिंग केलेले आहेत. ४५११ जणांना पहिला हप्ता दिला. पाचशे जण अजून पहिला हप्ताच न मिळालेले आहेत. तर तिसरा हप्ता दिलेले केवळ ९८0 जण आहेत. त्यामुळे चार हजार घरकुललाभार्थी निधीअभावी चाचपडताना दिसत आहेत. प्रशासनाकडून मात्र तांत्रिक अडचणींचे कारण सांगितले जात आहे. अनेकांचे बँक खातेच जुळत नसल्याचेही समोर येत असून ही अडचण दूर करण्यात मात्र दिरंगाई केली जात आहे.