- इस्माईल जाहागिरदारवसमत (हिंगोली) : तालुक्यात अतिवृष्टी झाली असल्याने सर्वच नदी, ओढ्याला पूर आला आहे. बोरगाव (कुटे) शिवारात केळी मजूर ओढ्याच्या पाण्यात अडकले होते. ही माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खलाळ यांना कळताच त्यांनी स्वतः बचावकार्य सोबत घेतले. गुरुवारच्या रात्री ९:३० च्या दरम्यान त्या पाच मजुरांना सुखरूप ओढ्याच्या पुरातून बाहेर काढले.
वसमत शहरात व तालुक्यातील काही भागात २७ जुलैला सायंकाळी अतिवृष्टीसदृश पाऊस झाला. यामुळे शहरातील रस्त्यांवर नदी पात्रासारखे पाणी वाहत होते. तालुक्यातील बोरगाव (कोटे) शिवारात केळी घेऊन जाण्यासाठी आलेले मजूर ओढ्याला आलेल्या पुरात अडकले होते. याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांना मिळाली. त्यांनी मंडळ अधिकारी प्रियंका खडसे, तलाठी परम गरुड यांचे मदतकार्य घेत ओढ्याच्या पुरात अडकलेल्या मजुरांना सुखरूप बाहेर काढत त्यांचा जीव वाचविला.