हिंगोली जिल्ह्यातील २६ लघू तलावांपैकी हिंगोली तालुक्यातील पारोळा व हिरडी हे दोन तलाव जोत्याखालीच आहेत. तर हिंगोली तालुक्यातील वडद १० टक्के, चोरजवळा २९ टक्के, सवड ६७ टक्के, पेडगाव ५ टक्के, हातगाव २७ टक्के, सेनगाव तालुक्यात सवना ४५ टक्के, पिंपरी ५२ टक्के, बाभूळगाव ६० टक्के, घेडदरी ७८ टक्के, पूर्णा तालुक्यात मरसूळ १९ टक्के, औंढा तालुक्यातील वाळकी २४ टक्के, सुरेगाव २१ टक्के, औंढा ३९ टक्के, सेंदूरसना ११ टक्के, पूरजळ १७ टक्के, वंजारवाडी १६ टक्के, पिंपळदरी ३३ टक्के, काकडदाभा ३६ टक्के, केळी २५ टक्के, कळमनुरी तालुक्यात कळमनुरी ५२ टक्के, बोथी २८ टक्के, दांडेगाव १५ टक्के, देवधरी १६ टक्के तर वसमत तालुक्यातील राजवाडी ४० टक्के असा साठा झाला आहे. कोल्हापुरी बंधाऱ्यांपैकी जिंतूर तालुक्यातील खोलगाडगा ७४ टक्के तर परभणी रहाटी बंधाऱ्यात ८१ टक्के जलसाठा आहे.
जिल्ह्यात ६४ टक्के पर्जन्य
हिंगोली जिल्ह्यात यंदा ६४ टक्के पर्जन्य झाले आहे. तरीही लघू तलावांतील जलसाठा मात्र त्या तुलनेत कमीच असल्याचे दिसून येत आहे. उरलेल्या काळात यातील काही तलाव भरण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. पारोळ्याचा तलाव तर पर्यटकांचे आकर्षण असतो; मात्र तो जोत्याखालीच आहे. तालुकानिहाय हिंगोली ५७.६१ टक्के, कळमनुरी ६४.३३ टक्के, वसमत ६१.९८ टक्के, औंढा ७९.९७ टक्के, सेनगाव ६१.०२ टक्के असे पर्जन्य झाले आहे.