शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
5
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
6
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
8
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
9
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
10
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
11
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
12
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
13
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
15
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
16
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
17
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
18
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
19
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस

दरोड्याच्या तयारीतील पाच जण जेरबंद; हत्यारासह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2023 2:04 PM

बाळापूर पोलिसांची कारवाई आज पहाटे कारवाई 

आखाडा बाळापूर : बाळापूर शहरालगतच्या रस्त्यावर हत्यारबंद पाच संशयित दरोडेखोरांना बाळापूर पोलिसांनी आज पहाटे ताब्यात घेतले. दरोड्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी कारवाई करून हत्यारासह 7 लाख 30 हजार 740 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हनुमाननगरच्या समोर बाळापुर ते बोल्डा रस्त्यावर ज्ञानसागर शाळेच्या अलीकडे शेतात जाणाऱ्या पांदण रस्त्यावर दरोडेखोर असल्याची खबर बाळापुर पोलिसांना आज पहाटे पावणेदोन वाजेच्या सुमारास मिळाली. पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले व त्यांच्या पथकाने लागलीच तिथे जात दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना ताब्यात घेतले. तर कुऱ्हाडी, खंजर, तलवार बॅटरी, मोबाईल व पिकअप वाहन ( क्र.एम.एच‌26 बीई -2821) असा एकूण 7 लाख 30 हजार 740 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले यांच्या फिर्यादीवरून, सय्यद सोहेल सय्यद युनूस (वय 22 , राहणार ढाणकी तालुका उमरखेड ) , सय्यद रमजान सय्यद अब्दुल  ( वय 22 , राहणार ढाणकी तालुका उमरखेड ) , अल्फाजोद्दीन उर्फ गौसोद्दीन मुजिबोद्दीन काझी ( वय 21 , राहणार सुकळी जहांगीर तालुका उमरखेड ) शेख जहीर शेख बाबू ( वय 19 , राहणार ढाणकी तालुका उमरखेड ) , सय्यद अजमत सय्यद रहिम ( वय 20, रा. ताज नगर, आखाडा बाळापूर) या पाच जणांच्या विरोधात भारतीय दंडविधानाच्या कलम 399 , 402 व भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार सुनील गोपीनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेख माजिद करत आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारी