हिंगोली येथील वन विभागातील वनमजूर शेख बाबामिया शेख मयनोद्दीन (वय ५५ रा. लिंबाळा मक्ता) हे एम.एच. ३८ एस ५९३५ या क्रमांकाची दुचाकी चालवीत होते. त्यांची दुचाकी लिंबाळा मक्ता येथील क्रीडा संकुल परिसरात आली असता समोरून येणाऱ्या एमएच ३८ डब्ल्यू ९३१३ क्रमांकाच्या टिप्पर चालकाने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. या अपघातात शेख बाबामिया शेख मयनोद्दीन यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सपोनि बी.आर. बंदखडके, पो.ना. अशोक धामणे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी टिप्पर ताब्यात घेेतले असून, याप्रकरणी शेख अखील शेख बाबामिया (रा. सम्राट अशोकनगर) यांच्या फिर्यादीवरून टिप्पर चालकाविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास सपोनि बी.आर. बंदखडके करीत आहेत.
टिप्परच्या धडकेत वनमजुराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 4:30 AM