हिंगोली जिल्ह्यात दिवसभर पावसाने रिपरिप चालूच ठेवली होती. अजून मधून पावसाच्या जोरदार सरी बरसत होत्या. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात चांगल्या पर्जन्याची नोंद झाली आहे. तालुक्यात मंडळनिहाय हिंगोली ३०.५, नरसी ३७.८, सिरसम ७८.५, बसंबा ४०.८, डिग्रस ३१.८, माळहिवरा ३७.५ खांबाळा ३४.८, कळमनुरी ३८.५ वाकोडी ३७.५, नांदापूर ४०.३, आखाडा बाळापूर ३९, वारंगा ३५.८, वसमत ४६, आंबा ४०.३, गिरगाव ३९.८, ह्यात नगर ४९, हट्टा ६९, टेंभुर्णी ३६.५, कुरुंदा ३८.३, औंढा ४८.५, येळेगाव ४२.५, साळणा ३८.५, जवळा ३५.८, सेनगाव ४३, गोरेगाव ४०.३, आजेगाव ३७.५, साखरा ५८.५, पानकनेरगाव ४३.८ अशी पावसाची नोंद झाली आहे
२२ रोजी दिवसभर ढगाळ वातावरण होते. अधून मधून रिमझिम पाऊस पडत होता. त्यामुळे रस्ते चिखलमय झाले होते.