जिल्ह्यात २३ रोजी एकूण ९४९ अँटिजन चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये हिंगोली ३३३, वसमत ४२, सेनगाव २८७, औंढा १४८, कळमनुरी १३९ अशा चाचण्या झाल्या. मात्र एकही बाधित आढळला नाही. तर आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये हिंगोलीत ७२ पैकी बांगरनगर १, गंगनगर १, वसमत परिसरात २२ पैकी सोमठाणा १, औंढा परिसरात ६२ पैकी पिंप्री १ असे ४ जण बाधित आढळले तर कळमनुरीत ५६ व सेनगावात ४२ पैकी एकही बाधित नाही. आज जिल्हा रुग्णालयातून बरे झालेल्या चार जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आजपर्यंत जिल्ह्यात एकूण १५ हजार ९१६ जण बाधित आढळले. यापैकी १५ हजार ४९९ जण बरे झाले. तर ३८१ जणांचा मृत्यू झाला. सध्या ३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी २२ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे तर ३ जणांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅपवर ठेवण्यात आले आहे.