कोरोना संसर्ग आजारांवरील रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पॅरामेडिकल क्षेत्रातील प्रशिक्षित मानव संसाधनाची तीव्र कमतरता जाणवत आहे. त्यासाठी या योजनेअंतर्गत प्रशिक्षण देण्यासाठी हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात असिस्टंट योगा इन्स्ट्रक्टर (पात्रता ८ वी पास), हेल्थ केअर क्वालिटी ॲस्युअरन्स मॅनेजर मेडिकल ग्रॅज्युएट (पात्रता : एमबीबीएस/ बीएचएमएस/ बीएएमएस/ बीयुएमएस तीन वर्षांच्या अनुभवासह), एल्डरली केअर टेकर (पात्रता ५ वी पास) तसेच जिल्ह्यात इतर हॉस्पिटलमध्ये जनरल ड्युटी असिस्टंट ॲडव्हान्स (पात्रता १० वी पास), तसेच पंचकर्म टेक्निशियन (पात्रता १२ वी पास) हे अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत.
गरजू उमेदवार किंवा ज्यांना वैद्यकीय ज्ञान घ्यावयाचे आहे व त्याद्वारे रोजगार मिळवायचा आहे किंवा वैद्यकीयज्ञानाशी संबंधित उमेदवारासाठी हे प्रशिक्षण कार्यक्रम नि:शुल्क असणार आहे. प्रशिक्षणार्थी उमेदवारास प्रमाणपत्र व रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://forms.gle/LXG93k9yYiQYZa6t5 या लिंकचा वापर करून गुगल फॉर्ममध्ये माहिती भरून लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे यांनी केले आहे.