लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील शास्त्रीनगर मध्ये असलेल्या सेक्रेट हार्ट चर्चमध्ये ख्रिसमस निमित्त आकर्षक केलेली सजावट नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. येथे ख्रिसमसची तयारी अंतिम आली असून, येथे केलेली सजावट पाहण्यासाठी नागरिक सायंकाळ पासूनच भेटी देत होते.बाल येशुचा जन्म दिवस जगभरात उत्साहात साजरा केला जातो. जगाला तारणारा येणार असल्याचा संदेश संदेशकानी दिला होता. योसेफ हा दावीदाच्या घराण्यातला व कुळातील होता. तो कामाच्या शोधामध्ये नासरेथ गावात आला होता. परंतु त्या काळी नावनिशी लिहिली जात असल्याने तो आपल्या पत्नीसोबत परत बेथलेम येथे मुळ गावी गेला होता. परंतु नावानिशी नोंद करायची असल्याने बाहेरगावी गेलेले सर्वच गावात परतले होते. त्यामुळे गावात जराही जागा नव्हती. योसेफ यांनी पत्नीच्या प्रसुतीसाठी अनेक दारांवर थापा मारल्या होत्या. परंतु कोणीही जागा न दिल्याने शेवटी मरियाने गोठ्यातील गव्हाणीत बाळ येशूला जन्म दिला. येशूचा जन्म होताच आकाशा मध्ये पांढरा शुभ्र तारा लखलखल्याने जगाला तारणाºयाचे आगमन झाल्याचे सर्वांना समजले. बाळ येशूचा जन्म होणार असल्याचे हेरोद राजाला कळताच त्यांच्यासह सर्वच जेरूसलेम घाबरुन गेले होते. राजाने मोठ्या कुतुहलाने मुख्य याजक व शास्त्री ह्यांना जमवून विचारले की, ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हायचा आहे. तसेच हेरोदाने मागी लोकांना गुप्तपणे बोलावून त्यांच्यापासून तारा दिसू लागल्याची वेळ नीट विचारुन घेतली व त्यांना बेथलेहेमास पाठविताना बाळ येशुची बारकाईने विचार पुस करण्याचे सांगितले होते असा फादर डिसुझा यांनी येशूचा इतिहास सांगितला. त्यामुळे येशूचा जन्म उत्साहात साजरा केला जातो. विशेष म्हणजे गवतापासून आकर्षक गोठा बनविला जातो. या महत्वपुर्ण दिवसानिमित्त चर्च मध्ये सजावट केली जाते. त्याच पार्श्वभूमीवर शास्त्रीनगरात चर्चमध्ये ‘थर्माकोल’च्या साह्याने आकर्षक सजावट करुन चर्च व गोठ्याच्या प्रतिकृतीवर रोषणाई केली आहे. परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
चर्चमध्ये ख्रिसमसची तयारी पूर्णत्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 1:15 AM