लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील तीन ते चार वर्षांपासून महावितरण आपल्या दारी या योजनेतील लाभार्थ्यांना वीज जोडणीची प्रतीक्षा आहे. तब्बल अडीच हजार जण अजूनही शिल्लक आहेत. त्यांची माहिती महावितरणच्या मुख्य कार्यालयाने मागविली असल्याने या कामांसाठी निधी मिळण्याचे संकेत मानले जात आहेत.हिंगोली जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून महावितरण आपल्या दारी या योजनेत केलेल्या सर्व्हेक्षणात नोंदणी केलेल्या शेतकºयांना वीज जोडणीची प्रतीक्षा आहे. हे शेतकरी अनेकदा महावितरणच्या कार्यालयात वीज जोडणीसाठी मागणी करताना दिसतात. त्याचबरोबर काँग्रेसच्या वतीने या योजनेला निधी देण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशाराही दिला होता. खा.राजीव सातव यांनी याप्रश्नी निवेदने दिली तरीही मागील वर्षभरापासून यात कोणतीच प्रगती होताना दिसत नव्हती. आता या योजनेत महावितरणकडून निधी मिळण्याचे संकेत प्राप्त होत आहेत. जिल्ह्यात या योजनेबाबत असलेल्या परिस्थितीचा इत्थंभूत अहवाल मागविण्यात आला आहे.या योजनेत ३६४३ लाभार्थ्यांचे काम होणे बाकी होते. त्यापैकी ३५२२ जोडण्यांचा सर्व्हे केला. यात हिंगोलीत ८८, वसमतला ४८, कळमनुरीत ३६0, औंढ्यात १५३, सेनगावात ३२९ जणांना विविध योजनांमधून वीज जोडणी दिल्याचे आढळून आले आहे. तर हिंगोलीत ५२, कळमनुरीत ४३ व औंढ्यात २६ जण तपासणीत आढळलेच नाहीत. त्यामुळे त्यांचा प्रश्नच आहे. याबाबतचा अहवाल दिला आहे.महावितरण आपल्या दारी या योजनेत पूर्ण करायच्या जोडण्यांची तालुकानिहाय संख्या हिंगोली-५३३, वसमत-३८९, कणमनुरी-७१९, औंढा-४८२ तर सेनगाव ४२१ अशी आहे. या सर्व कामांसाठी अंदाजित २३ ते २५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. अजून या कामांची अंदाजपत्रके तयारकरण्याच्या कामास प्रारंभ झाला नाही. केवळ या योजनेतील शिल्लक राहिलेल्या लाभार्थ्यांचीच संख्या मुंबईच्या कार्यालयास कळविण्यात आली आहे. पुढील सूचना आल्यानंतर प्रत्यक्ष निधी व इतर बाबींचा अंदाज येईल, असे सांगण्यात आले.या योजनेत निधी नसल्यानेच ही कामे ठप्प होती. आता अहवाल मागितला हे खरे आहे. निधी आल्यास तत्काळ कामे करू, असे कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी यांनी सांगितले.
२५४४ जोडण्यांना निधीचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 12:43 AM