शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

हिंगोलीत जैविक कचराही टाकताहेत कचराकुंडीतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:42 AM

शहरातील विविध रुग्णालयातील जैविक कचरा (बायोमेडिकल वेस्ट) पालिकेने नागरी वस्त्यांसाठी ठेवलेल्या कचराकुंडीत बिनधास्तपणे टाकला जात आहे. मात्र पालिका नोटिसा बजावण्यापलिकडे कोणतेच पाऊल उचलत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही रुग्णालये नागरी वस्तीत ठेवलेल्या कचरापेटीत बायोमेडिकल वेस्टच टाकत असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देदुर्लक्ष : नोटिसा बजावून पालिकाही थकली; कंपनीही सुटी घेत असल्याचे महाविदारक चित्र

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील विविध रुग्णालयातील जैविक कचरा (बायोमेडिकल वेस्ट) पालिकेने नागरी वस्त्यांसाठी ठेवलेल्या कचराकुंडीत बिनधास्तपणे टाकला जात आहे. मात्र पालिका नोटिसा बजावण्यापलिकडे कोणतेच पाऊल उचलत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही रुग्णालये नागरी वस्तीत ठेवलेल्या कचरापेटीत बायोमेडिकल वेस्टच टाकत असल्याचे दिसत आहे.हिंगोली शहरातील एकूण १०६ रुग्णालयांनी बॉम्बे नर्सिंग होम अ‍ॅक्टनुसार जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे नोंद केलेली आहे. नोंद असलेल्या रुग्णालयातील बायोमेडिकल वेस्ट जालना येथील अतुल एन्व्हायरमेंटल सर्व्हिसेसच्या वतीने उचलले जाते. या कंपनीकडे शहरातील नोंदणीकृत रुग्णालयातील जैविक कचरा उचलण्यासाठी करार केलेला आहे. मात्र या कंपनीकडे जिल्ह्याचा भार वाढलेला असल्याने यंत्रणाच अपुरी पडत आहे. विशेष म्हणजे कंपनीला रंगपंचमी सोडून इतर सर्व दिवस रुग्णालयातील कचरा उचलण्याच्या सूचना नियमानुसार दिलेल्या आहेत. मात्र कंत्राटदाराने मनानेच आठवड्यातून रविवारी कचरा उचलणे बंद केल्याने रुग्णालयात मोठ्या प्रमाणात कचरा साचत आहे. असे वर्षात तब्बल ५२ दिवस कचरा उचलला जात नाही. त्यामुळे मात्र चांगलीच गैरसोय होते. त्यामुळे अनेक जण रुग्णालयातील जैविक कचरा कमी करण्यासाठी थेट कचराकुंड्यांचाच वापर करण्याचा फंडा करतात.अशा कचराकुंड्यांमध्ये नागरी कचराही टाकला जातो. शिवाय रुग्णांचे नातेवाईक उरलेले अन्न फेकून देत असल्याने गुरे त्यावर तुटून पडत असल्याचेही प्रकार घडत आहेत. नियमानुसार रुग्णालयातील जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी घेणे बंधनकारक असल्याने सर्व डॉक्टरांनी एकत्र येत दिवसाकाठी जैविक कचरा उचलण्याचे वेगवेगळे दर ठरवून सदर कंपनीवर जबाबदारी सोपविली आहे. मात्र कंत्राट दिला तेव्हापासून एकदाही या कंत्राटदाराने हिंगोलीला भेट दिली नसून त्यांच्या कर्मचाºयांनाही अनेकदा निरोप दिल्याचे डॉक्टरांच्या वतीने सागिंतले.लक्ष देण्याची गरज : अपुरी पडतेय यंत्रणाज्या यंत्रणेकडे जिल्ह्यातील कचरा उचलण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तिच्याकडे रुग्णालयाचा भला मोठा व्याप वाढला आहे. मात्र मनुष्यबळच अपुरे असल्याने ते प्रत्येक रुग्णालयातील जैविक कचरा वेळेत उचलू शकत नसल्याने रुग्णालय परिसरात कचºयाचे ढिगार वाढत आहेत.प्रत्येक रुग्णालयात कचरा टाकण्यासाठी ठेवण्यात आलेल्या कचरा कुंडीत कलर कोडनुसार कचरा टाकण्याची व्यवस्था केलेली असते आणि त्याच कलर कोडनुसार कचरा उचलणारी व्यक्ती कचरा उचलून घेऊन जाते असते.सुटीने गैरसोयजिल्हा सामान्य रुग्णालयातील बायोवेस्ट नियमित उचलले तर अडचण कमी होते. मात्र कंपनीचे कर्मचारी दर रविवारी सुट्टी मारत असल्याने त्याची दिवशी चांगलीच गैरसोय होत असल्याचे शल्यकित्सक आकाश कुलकर्णी यांनी सांगितले.नोटिसा बजावल्या आहेतशहरातील विविध खाजगी रुग्णालयांच्या परिसरात ठेवलेल्या कुंड्यांमध्ये जैविक कचरा टाकण्यात आल्याने संबंधित डॉक्टरांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. आता मात्र टोकाचे पाऊल उचलले जाईल, असे न.प.मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सांगितले.महागडी यंत्रणा असल्याने अडचणजैविक कचरा नष्ट करण्यासाठीची यंत्रणा अतिशय महागाडी आहे. ही यंत्रणा केवळ जालना आणि यवतमाळ येथे उपलब्ध आहे. तर जालना जवळ असल्याने तेथील कंपनीशी करार केल्याचे इमाचे सचिव डॉ. स्रेहन नगरे यांनी सांगितले.सुटी वगैरे काही नाहीहिंगोली आणि परभणीसाठी अतुल एन्व्हायरमेंट कंपनीद्वारेच जैविक कचरा उचलला जातो. संबंधित यंत्रणेने भाग वाटून घेतलेले आहेत. हॉस्पिटलच्या खाटांच्या संख्येनुसार कचरा उचलण्याचे त्यांचे नियोजन असते. तर या कामासास सुटी नसल्याचे प्रदूषण नियंत्रण कार्यालयातून सांगितले.

टॅग्स :Hingoliहिंगोलीhospitalहॉस्पिटलdumpingकचराpollutionप्रदूषण