महागाईमुळे किराणा, भाजीपाल्यासोबत घरगुती सिलिंडरचे दरही वाढले आहेत. ग्रामीण भागात स्वयंपाक करण्यासाठी जळतण तरी मिळते. शहराच्या ठिकाणी जळतणही मिळत नाही. सिलिंडर संपले की काही दिवस विजेच्या शेगडीवर सणावाराचा स्वयंपाक करावा लागत असल्याचे गृहिणींनी सांगितले.
शहरात चूलही पेटविता येत नाही...
ग्रामीण भागात चुलीवर स्वयंपाक करणे काही वाटत नाही. कारण जळतण मिळणे सोयीचे असते. ग्रामीण भागात सर्रासपणे चुलीवर दोन्ही वेळेस स्वयंपाक केला जातो. परंतु, शहराच्या ठिकाणी जळतण मिळत नाही. धुरामुळे घराचे छत खराब होऊन बसते.
- प्राची हरिष पुंडगे, गृहिणी
सद्य:स्थितीत महागाईने कळस गाठला आहे. गॅस संपला की चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. मध्यंतरी शंभर ते दीडशे सबसीडी मिळायची. परंतु, आता शासनाने सबसिडीही बंद केली आहे. त्यामुळे घराचा गाडा कसा हाकावा हा यक्ष प्रश्रच आहे.
- सविता बांगर, गृहिणी