लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ११ आॅक्टोबर रोजी होणार असून यामध्ये १४ विषय पत्रिकेवर आहेत. तर ऐनवेळचे विषयही वेगळे राहणार आहेत. काही दिवसांपूर्वी सभा न घेतल्यावरून प्रशासनास कोंडीत पकडण्याचा प्रयत्न काही सदस्यांनी केला होता. मात्र मध्यंतरी झालेल्या विशेष सभांमुळे ते शक्य झाले नाही.यात कृषी समितीवरील एका रिक्त जागेवर सदस्याची नियुक्ती करणे, कन्हेरगाव नाका येथील कर्ममेळा वसतिगृहाच्या प्रलंबित २९ महिन्यांच्या मुदतबाह्य देयकापोटी ८.८३ लाखांना मान्यता देणे, सेनगाव पंचायत समितीच्या २0१८-१९ च्या मूळ अंदाजपत्रकातील तरतुदीमध्ये केलेल्या बदलास मान्यता देणे, हायतनगर येथे ग्रा.पं.ला गाळे बांधकामासाठी जिल्हा ग्राम विकास निधीतून कर्जास मंजुरी देणे, आरोग्य विभागास साहित्य खरेदी, पशुसंवर्धन विभागाच्या उपक्रमास सहकार्य, जि.प.सेसअंतर्गत कृषीच्या कामांच्या बदलास मान्यता देणे आदी विषय आहेत.यामध्ये सर्वांत महत्त्वाचा ठराव जि.प.च्या व्यापारी गाळे बांधकामाचा असून सव्वा कोटीच्या कामास प्रशासकीय मान्यतेचा ठरावही यात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही बाब केवळ चर्चेत होती. आता ती प्रत्यक्षात येणार असल्याचे दिसते.
११ रोजी जि.प.ची सर्वसाधारण सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 12:42 AM