शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

औंढा तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 3:04 PM

औंढा तालुक्यातील काही गावांसह वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील गावास आज दुपारी १२ च्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला

ठळक मुद्देऔंढा तालुक्यातील काही गावांसह वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील गावास आज दुपारी १२ च्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता २.१ इतकी नोंद करण्यात आल्याची माहिती स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे भूकंप मापक विजय कुमार यांनी दिली आहे.

औंढा /वसमत, दि. 16- औंढा तालुक्यातील काही गावांसह वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील गावास आज दुपारी १२ च्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असून रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता २.१ इतकी नोंद करण्यात आल्याची माहिती स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे भूकंप मापक विजय कुमार यांनी दिली आहे.

औंढा तालुक्यातील पिंपळदरी, पांगरा शिंदे, अमदरी, सोनवाडी, जामगव्हाण, जलालदाभा आदी भागात दुपारी १२.१० च्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. त्यानंतर परिसरातील गावांत एकच गोंधळ उडाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान, धक्का जरी सौम्य असला तरी या भागातील काही नागरिकांच्या घराच्या भींतीला तढे गेले असल्याची माहिती असून काही भागात शेतातील विहिरींचे दगड कोसळून पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  दरम्यान, दुपारच्या वेळी भूकंपाचा हादरा जाणवल्यामुळे सोनवाळी येथील  जि.प. च्या भींतीला तढे गेले असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे काही भागातील शाळा उघड्यावर सुरू ठेवण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे गत १५ दिवसापूर्वी या भागात १.१ रिश्टर स्केल भूकंपाची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे भागात मागील काही महिन्यापासून भूगर्भातून आवाज येत असल्याच्या घटना घडत असल्याने येथील नगारिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.