लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील भाजीमंडईतील गालेलिलावाची मागील १७ ते १८ वर्षांपासून प्रलंबित असलेली प्रक्रिया अखेर ८ जून रोजी पूर्ण झाली. नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या अध्यक्षतेखालील लिलावात १३ गाळ्यांतून पालिकेला २४ लाख ७४ हजार रुपयांची अनामत जमा झाली आहे.पालिकेचे शहरात मोठ्या प्रमाणात गाळे आहेत. मात्र भाजीमंडईतील गाळ्यांची अनेक वर्षांपासून फक्त चर्चा होत होती. त्यांचा लिलाव मात्र काहीकेल्या होत नव्हता. मात्र आता या गाळ्यांचा लिलाव झाल्याने प्रतिगाळ्याला ३ हजार रुपये महिना आकारण्यात आला आहे. यातून पालिकेला यातून प्रतिमहिना ३९ हजार रुपये उत्पन्न मिळणार आहे.तर पालिकेच्या इतर गाळ्यांचाही शोध घेतला जात आहे. गाळ्याची संपूर्ण माहिती मिळताच त्याच्याही लिलावाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गाला ९ गाळे तर प्रवर्गातील लाभार्थ्यांना तीन यामध्ये एका अपंगासाठी राखीव ठेवण्यात आला होता.यावेळी अध्यक्ष बाबाराव बांगर, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, सीओ रामदास पाटील, सुनिल कावरखे, आमेरअली मसूद, नगरसेवक गणेश बांगर, अनिल नैनवाणी, गोपाल अग्रवाल, शेख कय्युम, शेख शकिल, नरसिंग नायक, दिनेश चौधरी, अब्दुल माबूद बागवान यांच्यासह लेखाधिकारी एस. जी. सूर्यवंशी, अर्जून सैदाने, अशोक गवळी, संदीप घुगे, भगवान जाधव वसुली विभागातील आदी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. इतर गाळे मिळाल्यास परत उत्पन्नात वाढ होण्यास मदत मिळणार आहे.
गाळे लिलावातून २५ लाख मिळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 12:54 AM