हिंगोली : लसीचे दोन्ही डोस घेऊन पंधरा दिवसांपेक्षा जास्त कालावधी झालेल्यांना आता रेल्वे, हवाई प्रवासासह मॉल प्रवेशासाठी युनिव्हर्सल पास ऑनलाइन लिंकवरून मिळत आहे. अनेक जण ही लिंक मोबाइलवरून शेअर करताना दिसत आहेत.
ज्यांनी लसीचे दोन डोस घेतल्यानंतर निर्धारित वेळेनंतर या लिंकवरून स्वत:चे छायाचित्र अपलोड करून माहिती भरली. त्यांना ही पास उपलब्ध होत आहे. अनेक जण त्याचा लाभ घेत असल्याचे दिसून येत आहे.
दोन्ही डोस घेतलेले किती?
फ्रंटलाइन वर्कर ५०८०
आरोग्य कर्मचारी ५७९७
१८ ते ४४ वयोगट ८५८६
४५ ते ६० २६७६९
६१ पेक्षा जास्त १९८७३
दोन्ही डोस घेतलेल्यांचे प्रमाण ६.६ टक्के
प्रशासनाकडे सूचना नाहीत
ही लिंक सगळीकडे मोबाइलवरून फिरत असली तरीही प्रशासनाकडे मात्र युनिव्हर्सल पासबाबत अशा काही सूचना नाहीत. शिवाय मोबाइल क्रमांक टाकल्यानंतर संबंधितांच्या लसींच्या डोसचे योग्य डिटेल्स येत असल्याने हे खोटे नाही, हे वाटत आहे. मात्र, याची तपासणी करूनच सांगता येईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.