शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
3
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
4
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
5
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
6
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
7
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
8
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
9
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
17
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
18
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
20
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

गिरगाव, ग्रा. पं., तिरंगी होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2021 4:04 AM

३१ डिसेंबर रोजी अर्जाची छाननी करण्यात आली. ऐन हिवाळ्यात गावगाड्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. १५ जानेवारी रोजी होत असलेल्या ...

३१ डिसेंबर रोजी अर्जाची छाननी करण्यात आली. ऐन हिवाळ्यात गावगाड्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. १५ जानेवारी रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी आता बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. इतर पॅनलपेक्षा आपला पॅनल कसा मजबूत असेल यासाठी पॅनलप्रमुख रणनीती आखताना दिसत आहेत. आपल्या पॅनेलचे सर्व उमेदवार कसे निवडून येतील, याची चाचपणी सुरू झाली आहे.

मागील पंचवार्षिकमध्ये निवडणुकीपूर्वी आरक्षण सुटल्याने सरपंचपदाचा उमेदवार पॅनलमधील इतर उमेदवारांचीदेखील रसद पुरवित होता. मात्र, या निवडणुकीत सरपंचपदाचे आरक्षण नंतर काढण्यात येणार असल्याने इच्छुकांनी पॅनलसाठी खर्च करण्यासाठी हात आखडता घेतल्याचे चित्र सध्यातरी पहावयास मिळत आहे.

पूर्वी काढलेले आरक्षण रद्द झाल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून तयारीला लागलेल्या भावी सरपंचाचा चांगलाच हिरमोड झाला. त्यामुळे ‘कही खुशी , कही गम’ चे चित्र आहे. सर्व इच्छुक पुन्हा तयारीला लागले असून त्यामुऴे प्रत्येक प्रवर्गासाठी आता चुरस निर्माण झाली आहे. त्यासाठी इच्छुकही आपल्या मतांचे समीकरण जुळविण्यात व्यस्त झाले असून आपल्याला किती मते पडतील आणि निवडून येण्यासाठी किती मते लागतील. याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. भाऊबंदासह मित्रमंडळी आणि नातेवाईकांची मते मोजली जात आहेत.

यंदा होणाऱ्या निवडणुकीत मातब्बर पुढाऱ्यांसमोर तरुणांचे आव्हान असल्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे. त्यामुळे यंदा मतदार कोणाला कौल देणार, याचा निर्णय निकालावर अवलंबून आहे.