‘शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:42 AM2018-08-28T00:42:55+5:302018-08-28T00:44:15+5:30

जिल्ह्यात सोयाबीनवर करपा व बुरशीजन्य रोग तर कापसावर बोंडअळी पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकºयांना एकरी ५0 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी खा.राजीव सातव यांनी जिल्हाधिकाºयांची शिष्टमंडळासह भेट घेवून केली.

 'Give compensation to farmers' | ‘शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या’

‘शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात सोयाबीनवर करपा व बुरशीजन्य रोग तर कापसावर बोंडअळी पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकºयांना एकरी ५0 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी खा.राजीव सातव यांनी जिल्हाधिकाºयांची शिष्टमंडळासह भेट घेवून केली.
जिल्हाधिकाºयांना निवेदन दिल्यानंतर खा.सातव म्हणाले, मागील काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. यामध्ये सोयाबीनवर करपासदृश्य रोग आला. मात्र कृषी विभाग यापासून अनभिज्ञ आहे. तर कापसावरही बोंडअळी पडली. यापूर्वीचीच बोंडअळीची मदत शेतकºयांना मिळाली नाही. शिवाय सरसकट कर्जमाफीही मिळाली नाही. अशावेळी पुन्हा शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सरकारने पूर्णपणे मदत केली पाहिजे. पूर्वीसारख्या भूलथापा देणे सोडून ही मदत करणे गरजेचे आहे. प्रशासनाने याचे पंचनामे करून मदतीची मागणी केल्याचे ते म्हणाले. यावेळी आ.संतोष टारफे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, अ‍ॅड. गयबाराव नाईक, ज्ञानेश्वर जाधव, भगवान खंदारे, कैलास सोळुंंके, श्यामराव जगताप, संजय राठोड, संतोष राजेगोरे, गजानन देशमुख, विश्वनाथ मांडगे, माणिक करडिले, प्रकाश आडे, संजय जाधव, विलास गोरे, विश्वनाथ फाळके, नंदू पाटील आदी उपस्थित होते.

Web Title:  'Give compensation to farmers'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.