लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आपण सर्वांनी विज्ञान स्विकारले असले तरी, वैज्ञानिक दृष्टिकोण अद्याप स्विकारला नाही. अज्ञानाला जर खरंच मुठमाती द्यायची असेल तर, सर्वांनीच वैज्ञानिक दृष्टिकोण जोपासला पाहिजे. असे प्रतिपादन हिंगोली येथील महावीर भवन येथे १७ डिसेंबर रोजी आयोजित सौजन्य गुरू गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांनी केले.यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांच्या संपादित सौजन्य गौरव ग्रंथाचे प्रकाशन वसंत पुरके यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक भ. मा. परसवाळे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त सहसंचालक लक्ष्मीकांत पांडे, जेष्ठ कवी इंद्रजीत भालेराव, विलास वैद्य, साहित्यिक अशोक अर्धापुरकर, तसेच डायटचे प्राचार्य गणेश शिंदे, मंदाताई पवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी दिपक चवणे, उप शिक्षणाधिकारी डी. के. इंगोले, आदी उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी त्यांनी शिवाजी पवार यांचा शैक्षणिक क्षेत्रातील खडतर प्रवासाबद्दल माहिती दिली. तसेच जिल्ह्यातील जि. प. च्या शंभर टक्के शाळा डिजीटलसाठी परिश्रम घेऊन राज्यपाल यांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्याने शिक्षणाधिकारी पवार यांचे कौतुक त्यांनी केले. पुढे बोलताना पुरके म्हणाले जगातला सर्वांत जास्त जबाबदार व्यक्ती म्हणजे शिक्षक होय. विद्यार्थ्यांची प्रगती आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी गुरूजी परिश्रम घेतात. त्यामुळे त्यांच्यावर एक सामाजिक जबाबादारीच आहे. शैक्षणिक गुणवत्तेत १७ क्रमांकावरून तिसरा क्रमांक आला, ते केवळ शिक्षकांमुळेच शक्य झाले असे, म्हणत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत विविध प्रसंग मिश्किल भाषेत सांगितले. गरिबीसारखा गुरू आणि परिश्रमासारखा मित्र नाही. त्यामुळे अनुभवातून माणूस खुप काही शिकतो. मनाने व वर्तनाने माणूस संदर असायला हवा, असे म्हणत त्यांनी अनेक उदाहरणे दिली. यावेळी महिला, पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.अडचणींतून मार्ग काढावा- शिक्षणाधिकारी पवारसदर कार्यक्रमात शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी पवार म्हणाले शिक्षण क्षेत्रात कर्तव्य बजावत असताना अनेक समस्यां समोर आल्या. अशा अड-अडचणी समोर आले तरी न डगमगता त्यातून मार्ग काढावा. जेष्ठ कवी इंद्रजीत भालेराव म्हणाले कुठल्याही कार्यक्षेत्रात जर प्रेमळ व निष्ठावान अधिकाºयासोबत कर्तव्य पार पाडत असताना सोबतच्याची आपसूकच प्रगती होते. यशस्वीतेसाठी व्ही. डी. देशमुख, केशव खटींग, एकनाथ कºहाळे, जी. बी. बोरकर, संजयी गिरी, लोंढे, आर. बी. जाधव, कुलदीप मास्ट, डॉ. रामभाऊ भाकरे, विकास जऊळकर, गजानन खिल्लारी तसेच समितीच्या पदाधिकारी परिश्रम घेतले.
वैज्ञानिक दृष्टिकोणातून ‘अज्ञानाला’ मुठमाती द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 11:30 PM
आपण सर्वांनी विज्ञान स्विकारले असले तरी, वैज्ञानिक दृष्टिकोण अद्याप स्विकारला नाही. अज्ञानाला जर खरंच मुठमाती द्यायची असेल तर, सर्वांनीच वैज्ञानिक दृष्टिकोण जोपासला पाहिजे. असे प्रतिपादन हिंगोली येथील महावीर भवन येथे १७ डिसेंबर रोजी आयोजित सौजन्य गुरू गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांनी केले.
ठळक मुद्देहिंगोली : माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांचे, सौजन्य गौरव ग्रंथ कार्यक्रमात प्रतिपादन