हिंगोली : कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. मास्कमुळे लिपस्टिकची विक्री कमी होत असली तरी, या काळात लिपस्टिक महत्त्वाचे नसून मास्क महत्त्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली.
कोरोनामुळे शहरातील सर्वच दुकाने आजमितीस बंद आहेत. जे दुकानदार दुकाने उघडतील त्यांना दंड लावला जात आहे. त्यामुळे काॅस्मेटिकचा बाजार थंडावला आहे. दुसरीकडे कोणताही समारंभ करायचा असेल तर मोजकेच अन् तेही २५ माणसे समारंभात असायला पाहिजे, अशी अट आहे. त्यातही प्रत्येकाने मास्क घालणे आवश्यक आहे.
लिपस्टिक शोभेची वस्तू नसून सौंदर्याचाचं भाग असल्याचे काही महिलांनी सांगितले. लिपस्टिकपेक्षा महिलावर्गांनी कोरोना काळात मास्कला प्रथम प्राधान्य द्यावे. आरोग्य चांगले तर बाकी सर्व काही चांगले, असे महिलांचे मत आहे.
प्रतिक्रिया
२४ तास घरातच, मग ब्यूटिपार्लर हवे कशाला?
कोरोना महामारीमुळे २४ तास घरातच बसावे लागत आहे. कोणता सण नाही, उत्सव नाही. घरातील कामेच संपत नाहीत. घरामध्ये राहून लिपस्टिक लावणे योग्यही नाही. मग ब्यूटिपार्लर हवे कशाला, असा प्रश्न काही महिलांनी उपस्थित केला.
सॅनिटायझरचा वापर करा, गर्दीत जाणे टाळा...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शहरातील सर्वच दुकाने बंद आहेत. लिपस्टिक सौंदर्याचा भाग असला तरी आरोग्याला आधी महत्त्व द्या. लिपस्टिकपेक्षा मास्क, सॅनिटायझरचा वापर करा, गर्दीत जाणे टाळा.
- स्मिता बंडाळे, ब्यूटिपार्लरचालक
संचारबंदीमुळे दुकाने बंदच आहेत...
सध्या दुकाने बंद आहेत. एखादा समारंभ असल्यास काही महिला लिपस्टिक खरेदीसाठी येऊन जातात. एकंदर लिपस्टिकची विक्री कमी असल्याचे दुकानदारांनी सांगितले.
मास्कचा वापर करा
कोरोनाने सर्वत्र हाहाकार उडवून दिला आहे. दिवसागणिक मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. तेव्हा लिपस्टिक महत्त्वाचे नसून मास्क महत्त्वाचा आहे.
-विद्या लाखकर
गर्दीत जाणे टाळावे
आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर मास्कचा वापर करणे हे योग्यच आहे. आरोग्य विभागानेही मास्क वापरण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. तेव्हा महिलांनी मास्कचा वापर करावा.
-शीतल दन्नर