शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

‘एक करोड दे, नही तो गोली मार देंगे’; व्यापाऱ्यास खंडणी मागणारा निघाला दुकानातीलच मजूर

By विजय पाटील | Published: April 11, 2024 4:38 PM

दुकानात काम करणाऱ्यानेच रचला गेम, पोलिसांनी धमकी देणाऱ्यास केली अटक

हिंगोली : मोबाइलवर कॉल करून ‘एक करोड दे दो, नहीं तो गोली मार के ठोक देंगे’, अशा वारंवार धमक्या देत एका व्यापाऱ्यास गंडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यास हिंगोली पोलिसांनी जेरबंद केले. या प्रकारामुळे व्यापाऱ्यांत दहशत निर्माण झाली होती.

वसमत येथील कापड व्यावसायिक मनोज दत्तात्रय दलाल यांना दि. ७ एप्रिल रोजी एका अनोळखी मोबािल क्रमांकावरून व्हॉट्स ॲपवर कॉल आला. यावर संबंधिताने त्यांना धमकी दिली. एक कोटी खंडणी दे दो नही तो गोली मारके ठोक देंगे. हा प्रकार वारंवार घडत होता. त्यामुळे त्यांना वसमत शहर पोलिस ठाणे गाठले. याबाबत गुन्हा दाखल केला. या प्रकाराची दखल घेत पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, वसमतचे कुंदनकुमार वाघमारे यांना तपासाच्या सूचना दिल्या.

यात खंडणी मागणाऱ्याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर तो स्वीच ऑफ असल्याचे आढळून येत होते. त्यामुळे पोलिसांनी या मोबाइल क्रमांकाची इतर माहिती मिळविली. त्यावरून मूळ नाव, गाव, पत्ता आदी प्राप्त करण्यासाठी सायबर सेलचे एक विशेष पथक नेमण्यात आले. त्यानंतर अवघ्या बारा तासांत आरोपी जेरबंद केला. सपोनि महादेव मांजरमकर, राजेश मलपिलू, शिवसांब घेवारे, फौजदार विक्रम विठुबोने, कर्मचारी दीपक पाटील, दत्तात्रय नागरे, इरफान पठाण, राजू गुठ्ठे, प्रभू मोकाडे, डी. जी. मात्रे, शेख बाबर, गजानन पोकळे, विठ्ठल काळे, गणेश लेकुळे आदींनी ही कामगिरी पार पाडली.

तांत्रिक विश्लेषणातून समोरी आली बाबसायबल सेलने केलेल्या तांत्रिक विश्लेषणातून हा मोबाइल क्रमांक राजस्थानमधील बलोतरा जिल्ह्यातील पचपदरा ताालुक्यातील मुसलमानका वास या गावातील वेल्डिंग व्यावसायिक महेबूब खान अब्दुल खान याचा असल्याचे समोर आले. त्यामुळे जी. श्रीधर यांनी बलोतराचे पोलिस अधीक्षक कुंदन कवरिया यांना या आरोपीचा पत्ता पाठवून आरोपी पकडण्यासाठी मदत मागितली. वसमत शहर ठाण्याचे पथकही राजस्थानला रवाना केले. आरोपी महेबूब खान यास ताब्यात घेऊन हिंगोलीत आणले. त्याला विचारपूस केली असता खळबळजनक माहिती समोर आली.

दुकानात काम करणाऱ्याचाच होता गेममहेबबूला मनोज दलाल यांच्या दुकानात काम करणाऱ्या कृष्णा तुकाराम बेंडे (वय १९, रा. पळशी, ता. वसमत) यानेच त्याचा गावातील ऑटोचालक मित्र ज्ञानेश्वर तुकाराम गाडगे (वय २३, ऑटोचालक) याने कामाला लावले होते. गाडगेच्या सांगण्यावरून महेबूब दलाल यांना गोळी मारण्याची धमकी देऊन एक करोड रुपये मागत होता. या तिघांनीच हा प्लॅन आखल्याचे समोर आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली