लॉकडाऊन असल्याने घराबाहेर पडू नका असे सांगणाऱ्या प्रशासनाचे कोणीच ऐकत नव्हते. एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आणि सगळेच ताळ्यावर आले.
९ एप्रिल
न.प. कर्मचाऱ्याला जमावाकडून मारहाण
हिंगोली नगरपालिकेकडून साफसफाईचे काम करण्यात येत असताना शहरातील इदगाह मैदानाजवळ सात ते आठ जणांनी न.प. कर्मचाऱ्याला मारहाण केली.
१६ एप्रिल
नातीसह आजोबाचा विहिरीत बुडून मृत्यू
हिंगोली तालुक्यातील बोडखी येथे शेतशिवारात सरपण आणण्यासाठी गेलेली नात विहिरीत पडली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नाला आजोबासह नातीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
वीज पडल्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू
हिंगोली तालुक्यातील बासंबा शिवारात वीज कोसळून घनश्याम पांडुरंग देवकर या १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
१७ एप्रिल
जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी
जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद उकरून काढल्याने डोंगरकडा फाटा येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
२४ एप्रिल
नागेशवाडी येथे दोन भावांचा मृत्यू
औंढा नागनाथ तालुक्यातील नागेशवाडी येथे धुणे धुण्यासाठी गेलेल्या बहिणीसोबत पोहणे शिकण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावंडांचा तलावात बुडून मृत्यू झाला.
२८ एप्रिल
विजेच्या धक्क्याने मृत्यू
कळमनुरी तालुक्यातील कुंभारवाडी येथील शेतात गुराख्याला विजेचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
२९ एप्रिल
वसमत तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के
वसमत तालुक्यातील कुरुंदा, पांगरा शिंदे, वापटी, राजवाडी, खांबाळा, सिरली, गिरगाव, डोणवाडा, सुकळी, कोठारी, चोंढी, आंबाचोंडी, पार्डी खुर्द आदी गावांत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.