औंढा नागनाथ येथे नवीन बसस्थानकाच्या बाजूला बांधकाम सुरू असताना सदरील बांधकाम थांबवा असे म्हणून नगरसेवक व इतर सात जणांनी मूळ मालकांशी हुज्जत घालून जिवे मारण्याची धमकी दिली. यामध्ये नगरसेवकांसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
८ जुलै
मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीला हिंगोलीत विरोध
हिंगोली येथे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले न.प. मुख्याधिकारी रामदास पाटील यांची नवी मुंबई महापालिका सहायक आयुक्तपदी बदली झाली. त्यांच्या जागी कुरुवाडे यांची निवड झाली. याप्रकरणी सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना या बदलीविरुद्ध निवेदन दिले होते.
२३ जुलै
पेरणीला पैसे नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या
कोरोना संकटात हाताला काम नाही. शेतात दुबार पेरणी करून पेरलेले सोयाबीन उगवले नाही. दुबार पेरणीसाठी बँक दारात उभी करायला तयार नाही. यामुळे निराश झालेल्या झुनझुनवाडी येथील अजय पवार या तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.