लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : हे सरकार आपले अपयश झाकण्यासाठी दुसऱ्याच्या डोक्यावर खापर फोडण्यात पटाईत आहे. राज्य दुष्काळाच्या खाईत असताना सरकार नावाची व्यवस्थाच कुठे दिसत नाही. दुर्दैवाने या सरकारला दुष्काळाची जाणीवच नसल्याने आम्ही ग्रामीण भागात वास्तव पाहणीसाठी फिरत असल्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथे त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत खा.राजीव सातव, आ.संतोष टारफे, अॅड. बाबा नाईक यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी विखे पाटील यांनी पीक परिस्थिती व पीकविम्याबाबत माहिती घेतली. तेव्हा गतवर्षी उडीद, मूग, सोयाबीन, कापूस आदीचा विमा काढला. मात्र छदामही मिळाला नाही. यंदाही अतिशय वाईट परिस्थिती असताना दुष्काळच जाहीर झाला नसल्याचे सांगितले. आता जनावरांना चारा नाही. पूर्णपणे कोरडवाहू असलेल्या या जमिनीत काहीच येत नाही. हाताला कामही नाही, असेही काही शेतकºयांनी सांगितले.यानंतर पत्रकारांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, दुष्काळ हाताळण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. कर्जमाफीही शेतकºयांपर्यंत पोहोचली नाही.कर्जमाफी तर आता व्याजासकट दिली पाहिजे. यंदाचा खरीप हंगाम गेल्याने ते कर्जही माफ व्हावे. तर शेतकºयांना सरसकट हेक्टरी ५0 हजार रुपये अनुदान द्यावे, अशी आमची मागणी आहे. जुलै-आॅगस्टपासून दुष्काळी स्थिती आहे. मात्र शासन अजूनही दुष्काळसदृश्य स्थिती जाहीर करण्यातच आहे. आणखी सात महिने दुष्काळाशी सामना करावा लागणार आहे. चारा, पाणी, ग्रामीण बेरोजगारांच्या हाताला काम हे महत्त्वाचे विषय केवळ जिल्हा कार्यालयात बसून घेतलेल्या बैठकांत सुटत नाहीत. त्यासाठी प्रत्यक्ष गावात पाहणी करावी लागते, असेही ते म्हणाले....तर निलंगेकरांची प्रकरणे सभागृहात मांडू-विखेभाजपचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी ही स्टंटबाजी असल्याचा आरोप केल्याबाबत विचारल्यावर ते म्हणाले, दुर्दैवाने त्यांना दुष्काळाची जाणीव नाही. त्यांचे अपयश आमच्या माथी फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. निलंगेकरांच्या भ्रष्टाचाराचीच प्रकरणे एवढी आहेत की त्यावर सभागृहात आम्ही बोलूच. मात्र निदान शेतकºयांचा अपमान तरी करू नये, अशी आशा असल्याचेही विखे पाटील म्हणाले. १९ नोव्हेंबरपासून अधिवेशन सुरू होत आहे. त्यात शासनाने खोटी आकडेवारी सांगून पोपटपंची केल्यास या दौºयातील वास्तव चित्र त्यांच्यासमोर मांडता येईल, असेही ते म्हणाले.
सरकारला दुष्काळाची जाणीवच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:21 AM