शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
2
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
3
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
4
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
5
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
6
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
7
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
8
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
9
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
10
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
11
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
12
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
13
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
14
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
15
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
16
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
17
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना
18
भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...
19
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका! ३ अब्ज डॉलर्सच्या करारवर सही झाली, पण...
20
"उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका

महाराष्ट्र, तेलंगणा राज्यात धान्याची चोरी करणारी टोळी पकडली

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: March 29, 2023 6:48 PM

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोली : महाराष्ट्रासह तेलंगणा राज्यात धान्य चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दापाश स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे. यातील तीन चोरट्यांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून १२ क्विंटल हरभरा, ४० क्विंटल सोयाबीन असा दोन लाख ५० हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. 

कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील दोन व वसमत तालुक्यातील कोठारी पाटी येथील एक दुकान फोडून चोरट्यांनी धान्य लंपास केले होते. या घटनांमुळे व्यापारी, नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच या संदर्भात विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्नही उपस्थित झाला होता. त्यामुळे चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांनी या बाबत तपास करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांना दिल्या होत्या. त्यावरून  पथकाने गुन्ह्याचा तपास सुरू केला होता. यावेळी यातील ३ चोरटे दुधवाडी (ता. हिमायतनगर), वायपना (ता. हदगाव) येथे असल्याची माहिती पथकाला मिळाली.

त्यावरून पथकाने सापळा रचत परमेश्वर उर्फ बाबू रामू गायकवाड (रा. दुधवाडी), शिवमंगल इश्वरदिन मिश्रा (रा. बेरोंचा जि. कोसांबी, उत्तरप्रदेश), माधव मसाजी पवार (रा. वायपना ता. हदगाव) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच शफातउल्लाह इस्तीयाक चौधरी उर्फ इरफान (रा. सोनाळे जि. ठाणे, मूळ गाव टोला हजीजोत, ता. मधूबनी उत्तरप्रदेश), शेर मोहम्मद इकबाल खान उर्फ शेख उर्फ शाहरूख (रा.शांतीनंगर जि. ठाणे, मूळ गाव आझमगड उत्तरप्रदेश) यांचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले. यातील दोघांच्या शोधात पथके रवाना झाली आहेत. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्याकडून १२ क्विंटल हरभरा, ४० क्विंटल ३० किलो सोयाबीन असा एकूण २ लाख ५० हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताधान्य चोरी करणाऱ्या टोळीने यापूर्वी नांदेड, मुंबई, तेलंगणामधील निर्मल, अदिलाबाद येथेही अशाच प्रकारची चोरी केली. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविलीआहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, सहायक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, पोलिस अंमलदार भगवान आडे, राजूसिंग ठाकूर, विठ्ठल काळे, सुमित टाले, आकाश टापरे, रोहित मुदीराज, प्रमोद थोरात, तुषार ठाकरे  यांच्या पथकाने केली.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारी