शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

गुराढोरांसह ग्रामस्थ उतरले रस्त्यावर; उपासमारीमुळे सरकारचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 2:29 AM

मुख्यमंत्री कार्यालयाचे आदेश धाब्यावर

सेनगाव (जि. हिंगोली) : दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणामुळे उपासमारीची वेळ आलेल्या ग्रामस्थांनी ताकतोडा गाव विक्रीला काढल्याची सरकारी पातळीवर पुरेशा गांभीर्याने दखल घेतली न गेल्याने अखेर ग्रामस्थ गुराढोरांसह रस्त्यावर उतरले आहेत.

शासकीय योजनांचा लाभ मिळत नसलेल्या ताकतोडा गावाची व्यथा लोकमतने मांडल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने त्याची दखल घेतली. गावकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे पालकमंत्र्यांनी निर्देश दिले. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तहसीलदारांना गावात जाऊन दोन दिवसांत सविस्तर अहवाल देण्याच्या सूचना दिल्या. मात्र तहसीलदार व स्थानिक अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना केवळ आश्वासने दिली. त्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी रविवारी ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर गुराढोरांसह दिवसभर आंदोलन केले.

फसवी कर्जमाफी, पीकविम्याचा लाभ न मिळाल्याने शेतकºयांनी इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. तीन दिवसांपासून शासनाच्या विरोधात सुरू असलेले आंदोलन रविवारी कायम होते. जबाबदार व्यक्ती मागण्या मान्य करेपर्यंत ग्रामस्थांचे आंदोलन सुरूच राहणार आहे.

स्थानिक अधिकाºयांची आश्वासने फसवीस्थानिक अधिकाºयांची आश्वासने फसवीतहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. ग्रामस्थांनी पीकविमा, कर्जमाफी या प्रमुख मुद्द्यांसह पीककर्ज देण्याची मागणी केली. मात्र, पीकविमा व कर्जमाफी हे शासन स्तरावरील मुद्दे असल्याने ते शासनाकडे पाठवू, असे तहसीलदारांनी सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांचे समाधान झालेले नाही. आश्वासने फसवी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्री