लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ग्रामसेवकावरील अतिरिक्त कामाचा जाण तणाव कमी करुन धुळे येथील ग्रामविकास अधिकारी एस. बी. वाघ यांना आत्महत्येस प्रवृत्त करणा-यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन सी.आय.डी.मार्फत चौकशी करण्याच्यासह इतर मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने जिल्हा कचेरीवर २४ जानेवारी रोजी मोर्चा काढला.पंचायत संस्थेत ग्रामपंचायत ही ग्रामीण जनतेशी व विकासाशी निगडीत असलेल्या महत्त्वाच्या संस्थेत ग्रामसेवक संवर्ग काम करतो. परंतु सद्यस्थितीत ग्रामसेवक ग्रामविभागाशी संबंधीत कर्मचारी न राहता मंत्रालयाची ग्रामीण पातळीवर कामे करणारा कर्मचारी आहे. मात्र तलाठी, कृषी सहायक, मुख्याध्यापक, आरोग्य सेवक, परिचारिका, लाईनमन, वनरक्षक आदींची कामे ग्रामसेवकावर सोपवली जात आहेत. तर शेतकरी कर्जमाफी, अर्ज भरणे, ग्रामसभा, बोंडबळी पंचनामे, बिजली सर्वेक्षण, पाणलोट समिती सचिव, कृषि पीकविमा, शेतातील पीक कापणी प्रयोग, मतदार याद्या सर्वेक्षण, बोगस डॉक्टर तपासणी, कीटकनाशक शेतकरी विषबाधा, तसेच गावातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त, प्लास्टिक गोळा करणे, वृक्ष लागवड, नवीन वाळू घाटाचे धोरण, महसूल विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना इ. कामांचा भार ग्रामसेवकांवर सोपवून त्यांना वेठीस धरले जात आहे. केंद्र, राज्य शासन व जि.प.च्या उत्पन्नाच्या योजना नागरिकांच्या मूलभूत गरजा, दैनंदिन कामकाज करीत असतानाही वरिष्ठ अधिकाºयांचा दबाव विनाचौकशी विनानोटीस निलंबित करणे, वेतनवाढ बंद करणे आदी प्रकारचा त्रास दिला जात आहे. तसेच मनरेगासारख्या मागणी आधारित योजनाही उद्दिष्ट देऊन करावयास भाग पाडणे, स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ग्रामसेवक संवर्ग रात्रंदिवस काम करीत असला तरीही नागरिकाची उदासीनता व त्यांच्या दृष्टीने शौचालय प्राथमिकता नसल्याने कामे होत नाहीत. त्यामुळे जिल्हाभरातील ग्रामसेवकांवर कारवाया झाल्या. परिणामी, दोन वर्षात ४० ते ५० ग्रामसेवकांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर जिल्हाध्यक्ष दिलीप पांढरे, सरचिटणीस राजेश किलचे आदींच्या स्वाक्ष-या आहेत.हल्ले वाढले : अतिरिक्त कामाचाही ताणराज्यात एक ते दीड हजारच्या वर ग्रामसेवकांवर प्राणघात्तक हल्ले झाले. तसेच हाणामाºया, शिवीगाळ, अरेरीवीची तर भाषा नेहमीचीच झाली आहे. त्यामुळे एस. बी. वाघ यांच्या आत्महत्येची चौकशी सी.आय.डी मार्फत करावी, वाघ यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाºयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, ग्रामसेवकाकडील अतिरिक्त कामाचा बोजा कमी करुन त्यांच्यावरील ताण कमी करावा, ग्रामसेवकांचे प्रश्न निकाली काढावे आदी मागण्यासाठी महाराष्टÑभर ग्रामसेवक संघटनेच्या वतीने मोर्चा काढला.
हिंगोली जिल्हा कचेरीवर ग्रामसेवकांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:13 AM
ग्रामसेवकावरील अतिरिक्त कामाचा जाण तणाव कमी करुन धुळे येथील ग्रामविकास अधिकारी एस. बी. वाघ यांना आत्महत्येस प्रवृत्त करणा-यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन सी.आय.डी.मार्फत चौकशी करण्याच्यासह इतर मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने जिल्हा कचेरीवर २४ जानेवारी रोजी मोर्चा काढला.
ठळक मुद्देमागण्या : अवांतर कामे वगळण्यात यावीत