लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जागतिक आदिवासी दिनानिमत्त १२ आॅगस्ट रोजी कळमनुरी ते हिंगोली या महामार्गावरून भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव रॅलीत सहभागी झाले होते. शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आलेल्या रॅलीत महिला, पुरूष व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.आदिवासी युवक कल्याण संघातर्फे दुचाकी रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये शहरासह ग्रामीण भागातील समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅली दरम्यान जय बिरसा मुंडा यांच्या गजराने शहर परिसर दणाणून गेला होता. शहरातील मुख्य मार्गावरून रॅली मार्गक्रमण करीत जिल्हा कचेरीसमोर समाजबांधव एकत्रित जमले होते. यावेळी मार्गदर्शन करताना आ. डॉ. संतोष टारफे म्हणाले ९ आॅगस्ट रोजीच आदिवासी दिवस होता. परंतु राज्यात मराठा समाजाचे आंदोलन सुरू असल्यामुळे त्यांना पाठींबा देत जागतिक आदिवासी दिवस १३ आॅगस्ट रोजी साजरा करण्यात येत आहे. मोठ्या संख्येने एकत्रित येऊन शांततेच्या मार्गाने रॅली काढून एकतेचा संदेश आदिवासी समाजबांधवांनी दिला आहे. एकोप्याने येऊन कामे केली तर नक्कीच समाजाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले. जि. प. सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांनी यावेळी युवकांना मोलाचे मार्गदर्शन केले. व दिल्ली येथे संविधानाचा अवमान करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यााची मागणी केली. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार कार्यक्रम घेण्यात आला.ा्रशासनास दिले निवेदन४शासकीय आदिवासी वसतिगृहातील डीबीटी योजना रद्द करून पूर्वीप्रमाणे भोजनाची सुविधा द्यावी. राज्यातील आदिवासी मुलांचा शिक्षणाचा प्रश्न सोडवावा. असुविधायुक्त इंग्रजी शाळांवर कारवाई करावी. शिवाय या संस्था रद्द कराव्यात. खोटे प्रमाणपत्र सादर करून आदिवासी समाजाच्या आरक्षणाचा फायदा घेणाºयांवर कारवाई करावी. या गंभीर प्रकारामुळे आदिवासी युवक नोकºयांपासून वंचित आहे. याकडे मात्र शासन दुर्लक्ष करीत आहे. यासह विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहे. निवेदनावर आ. डॉ. संतोष टारफे, डॉ. सतीश पाचपुते, बबन डुकरे, उत्तम आसोले, रामराव वाघडव, मारोती बेले, चंद्रकांत डुकरे, बाजीराव जुंबडे, चंद्रभागा जाधव, गणाजी बेले, कल्पना घोगरे, संजय काळे, अशोक दळवे, गजानन गिरे, प्रमोद फोपसे, दत्तराव ठोंबरे, गारोळे, शंकर शेळके, अनिताताई भुरके, आशाताई धुमाळे यांच्यासह शेकडे समाजबांधवांच्या स्वाक्षºया आहेत.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 1:20 AM