लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : नांदेड येथून सुरु होणाऱ्या हुजूर साहिब नांदेड ते जम्मूतवी या ‘हमसफर एक्सप्रेस’ रेल्वेगाडीलाहिंगोलीरेल्वे स्थानकावर खा.राजीव सातव यांनी हिरवी झेंडी दाखवली.श्री हुजूर साहिब नांदेड ते जम्मूतवी एक्सप्रेस रेल्वेगाडी सचखंड गुरुव्दाराच्या दर्शनासाठी उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली येथून येणाºया यात्रेकरुंसाठी ही गाडी खा.राजीव सातव यांच्या दोन वर्षाच्या पाठपुराव्यानंतर सुरू झाली. नांदेड ते जम्मू काश्मीरला जाण्य- येण्याकरिता नांदेड येथून रेल्वेची सुविधा नव्हती. सचखंड गुरूद्वारा पवित्र स्थानाचा दर्शनासाठी येणाºया व अमरनाथ वैष्णोदेवी मातेच्या दर्शनासाठी जाणाºया भाविकांसाठी सुविधा झाली. दर शुक्रवारी नांदेडच्या रेल्वेस्थानकावरुन ही गाडी आठवड्यातून एकदा धावणार आहे. ही गाडी पूर्णा येथे ५.२० वाजता, वसमत ६.१० वाजता, हिंगोली ६.५६ वाजता, वाशिम ७.४५ वाजता, अकोला रात्री ९.५० वाजता, मलकापूर रात्री ११.०८ वाजता तर इटारसी येथे १०.४० वाजता, हबीब गंज येथे रात्री सव्वाबारा वाजता, वीणा येथे सकाळी २.३८ वाजता, झाशी येथे सकाळी ४.५० वाजता, ग्वालेर येथे सकाळी ६.१० वाजता, आग्रा येथे सकाळी सव्वानऊ वाजता, मथूरा येथे सकाळी १०.१० वाजता, नवी दिल्ली येथे दुपारी १.१५ वाजता, अंबाला येथे दुपारी ४.३५ वाजता, लुधियाना येथे सायंकाळी ६.२० वाजता, जालंधर येथे रात्री ७.१५ वाजता, पठाणकोट येथे ९.१७ वाजता तर जम्मूतावी येथे रात्री ११.३० वाजता पोहोचणार आहे.परतीच्या प्रवासात रविवारी ही गाडी सकाळी ७.२५ वाजता जम्मूतावी स्थानकावरुन सुटेल आणि ती याच मार्गावरुन सोमवारी रात्री ८.४५ वाजता हुजूर साहिब नांदेड स्थानकावर पोहचेल.
हमसफर एक्सप्रेसला हिरवी झेंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 11:52 PM