सेनगाव: परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले खरीपाचे पिक पुर्णतहा हातचे गेले असून मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी झाली आहे. या नुकसानीची शनिवारी पालकमंत्री अतुल सावे यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांचा शेतात जावून पाहणी केली व शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले.
तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा चागलाच घात केला.काढणीला आलेले सोयाबीन कापसाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे.उभा असलेल्या,काढुन ठेवलेल्या सोयाबीन ला सततच्या पावसाने काढणीचा अगोदरच अंकुर फुटले आहे.बुरशी चढली असून तालुक्यातील प्रमुख पिक असलेले सोयाबीन जवळपास अंशी टक्के शेतकऱ्यांचे वाया गेले आहे. झेंडू फुलाची दिवाळी दरम्यान सुरू झालेल्या सततधार पावसाने तोड हि करता आली नसल्याने तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. या नुकसानीची पाहणी, एकूण परिस्थितीचा आढवा घेण्यासाठी शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास पालकमंत्री अतुल सावे, आमदार तानाजी मुटकुळे यांनी तालुक्यातील येलदरी, चिंचखेडा, हत्ता, भानखेडा येथील शिवारात जावून सोयाबीन, कापुस, ज्वारी आदी पिकांची पाहणी केली. या वेळी परिसरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. तसेच शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी केली.
यावेळी पालकमंत्री सावे यांनी परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानीची माहिती तातडीने शासनाकडे पाठविण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. या वेळी भाजप तालुका अध्यक्ष अशोक ठेंगल, अप्पासाहेब देशमुख, नारायण राठोड, श्रीकांत कोटकर, सुर्यभान ढेगळे, श्रीरंग राठोड, हिमत राठोड यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.