या सभेत न.प. फंडांतर्गतच्या कामांचा खर्च, न.प. हद्दीतील गुंठेवारी प्रकरणे नियमाधिन करणे, ही प्रकरणे करण्यासाठी विकास कर, प्रशमन शुल्क आदी निश्चित करणे, हिंगोली शहरातील कराचे सर्वेक्षण करून, आरएफआयडी तंत्रज्ञानाचा वापर करून, कचरा संकलन व वाहतुकीकरण देखरेख नियंत्रणाचा प्रस्तावही चर्चेसाठी ठेवण्यात आला आहे. हिंगोली शहरातील जातीवाचक १६ वस्त्यांची नावे बदलण्याचा ठरावही ठेवला आहे. सफाई कामगारांच्या वारसाची तीन प्रकरणेही विचारार्थ ठेवली आहेत. क्रीडा कार्यालयाजवळील चौकास स्वातंत्र्यवीर ॲड.भाई कोतवाल यांचे नाव देण्याचा ठरावही ठेवला आहे.
शहरातील विविध भागांतील अनधिकृत बांधकामांबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, यापूर्वीही गुंठेवारीची काही प्रकरणे दाखल झालेली आहेत. आता नव्या २०२१च्या आदेशामुळे आणखी काही बांधकामांचा प्रश्न मोकळा होणार आहे. या नव्या निर्णयानुसार निर्णय घेण्यासाठी नगरसेविका स.नाजनीन जावेद राज यांनीही निवेदन दिले होते.