लोकमत न्यूज नेटवर्ककुरूंदा : येथे मोटार दुचाकीवरून गावात गुटखा येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच छापा मारुन ७३५० रुपयांचा गुटखा पकडण्यात आला. दुचाकीही जप्त केली असून एकास ताब्यात घेतले.कुरूंदा येथे गुटखा व्यवसाय फोफावला होता. त्यावर लगाम लावण्यासाठी कुरूंदा पोलिसांनी सापळा रचून वसमत येथून येणारा गुटखा पकडला. ही कारवाई सपोनि शंकर वाघमोडे यांच्या पथकाने केली असून ७३५० रुपयाचा गुटखा व एक मोटारसायकल जप्त करण्यात केली आहे. या प्रकरणी एक जणाला ताब्यात घेण्यात आले असून उशिरापर्यंत कार्यवाहीची प्रक्रिया सुरू होती. कुरूंद्यात गुटख्याच्या व्यवसायाने थैमान घातलेले असून बिनधास्तपणे गुटखा व्यवसाय सुरू होता. चंदन पाठोपाठ गुटखा व्यवसायाने जोर धरला असून अर्धापूर मार्गे गिरगाव व कुरूंदा येथे गुटखा येत आहे. पोलिसांनी कार्यवाही केल्यानंतर गुटखाविक्री बंद होती. आता पुन्हा हा प्रकार समोर आला.औंढ्यात ६० हजारांचा गुटखा पकडला४औंढा नागनाथ : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक केंद्रे यांच्या पथकाने शहरातील दोन जर्दा दुकानावर धाड टाकून साठ हजार रुपये किमतीचा सुगंधीत तंबाखू, सुगंधी सुपारी, राजू विलायची इत्यादी माल जप्त केला. २ आॅगस्ट रोजी हिंगोली येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कार्यवाही करीत शेख मुनिर व मुन्ना खतीब यांच्या जर्दा दुकानावर धाड टाकली. यावेळी दुकानात राजू विलायची, पान पराग, राजनीगंध, सुगंधित तंबाखू असा साठ हजाराचा ऐवज जप्त केला असून औंढा पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला. या पथकामध्ये नानाराव पोले, शंकर जाधव, विलास सोनवणे, शैलेश चौधरी, शंकर ठोंबरे आदी होते.
दोन ठिकाणी गुटखा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 12:42 AM