शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगले कोपरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 5:26 AM

मुख्य रस्त्यावर होतेय अतिक्रमण हिंगोली: शहरातील काही मुख्य रस्त्यावर दुकानदार दुकानातील साहित्य ठेवत आहेत. दुकानाच्या पुढे साहित्य ठेवले जात ...

मुख्य रस्त्यावर होतेय अतिक्रमण

हिंगोली: शहरातील काही मुख्य रस्त्यावर दुकानदार दुकानातील साहित्य ठेवत आहेत. दुकानाच्या पुढे साहित्य ठेवले जात असल्याने रस्ता अरूंद होत आहे. नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण धारकांवर कारवाई केली जात असली तरी कारवाईचे पथक आल्यानंतर रस्त्यावर ठेवलेले साहित्य पुन्हा दुकानात ठेवले जात आहे. पथक गेल्यानंतर अतिक्रमण जैसे थे होत आहे. त्यामुळे रस्त्यावर साहित्य ठेवणाऱ्या दुकानदारावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

जिल्हा रूग्णालय परीसरात स्वच्छतेची गरज

हिंगोली: शहरातील जिल्हा रूग्णालयात जिल्हाभरातून रूग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे हा परिसर दिवसभर गर्दीने फुलून जातो. रूग्णालयात् स्वच्छता नियमित असली तरी रूग्णालयाच्या बाहेर मात्र स्वच्छता नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रूग्णालयाच्या बाहेर बसणाऱ्या रूग्णांच्या नातेवाईकांना याचा त्रास होत आहे. रूग्णालय परीसरातही स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज असल्याचे मत नातेवाईकांतून व्यक्त होत आहे.

नांदेड नाका रोडवर गतीरोधकाची मागणी

हिंगोली : नांदेड नाका ते उड्डाण पुलापर्यंत काही दिवसांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले आहे. परंतु, रस्त्यावर गतीरोधक कुठेही टाकण्यात आले नाही. त्यामुळे काही वाहनचालक भरधावपणे वाहने चालवित आहेत. परिणामी छोटे-मोठे अपघात घडत आहेत. संबंधित विभागाने याची दखल घेऊन गतीरोधक बसवावे, अशी मागणी होत आहे.

वातावरण बदलाचा रबी पिकांना फटका

सवना : सेनगाव तालुक्यातील सवना, सवनातांडा, वायचाळ पिंपरी, ब्राह्मणवाडा, सुरजखेडा आदी गाव परिसरात १७ फेब्रुवारी रोजी हलकासा पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली. वातावरण बदलाचा हरभरा,गहू पिकांना चांगलाच फटका बसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी

कळमनुरी : शहरातील बसस्थानकात मागील काही दिवसांपासून कचऱ्याचे ढीग साचलेले पहायला मिळत आहेत. वारंवार आगार प्रमुखांना सागूनही अद्याप बसस्थानकात साफसफाई करण्यात आली नाही. एस. टी. महामंडळाने याची दखल घेऊन बसस्थानकात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.

साइडपट्ट्या भरण्याची मागणी

आखाडा बाळापूर: कळमनुरी तालुक्यातील जरोडा ते साळवा पाटीदरम्यानच्या हिंगोली ते नांदेड मार्गाच्या दोन्ही बाजूच्या साइडपट्ट्या खचल्या आहेत. त्यामुळे वाहने खाली उतरल्यास पुन्हा डांबरी रस्त्यावर घेताना वाहने उलटण्याचे प्रकार घडत आहेत. अनेक वेळा अपघाताला सामोरे जावे लागत आहे. याकडे लक्ष देऊन दोन्ही बाजूंच्या साइडपट्ट्या भरण्यात याव्यात, अशी मागणी वाहन चालकांतून होत आहे.

शौचालयाचा वापर करण्यास टाळाटाळ

हिंगोली : शहरातील शाहु नगर परिसरातील बरेच नागरिक सकाळी शौचास उघड्यावर जात आहेत. प्रत्येकाच्या घरी शौचालय असून सुद्धा नागरिक त्याचा वापर न करता उघड्यावरच जाणे पसंत करीत आहे. यामुळे याठिकाणी मॉर्निंग पथकाने लक्ष द्यावे अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून होत आहे.

रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष

हिंगोली : शहरातील खटकाळी रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या बांधकामाच्या जवळून गेलेला रस्ता हा पूर्णपणे उखडला असून येथील गिट्टीही उघडी पडली आहे. त्यामुळे वाहनधारकांचे वाहने घसरुन अपघात होत आहे.

वीजपुरवठा वारंवार खंडीत

औंढा ना. : तालुक्यातील येहळेगाव सो. गावाचा वीजपुरवठा दिवस-रात्र खंडीत होत आहे. यामुळे अनेक नागरिकांचे वीजउपकरणे जळाल्याचे प्रकार घडले आहे. यामुळे महावितरणच्या कारभाराविषयक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. गावातील वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.