लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील पेन्शपुरा भागातील मेराजुलउलूम मस्जिदे येथे हज साठी जाणाऱ्या मुस्लिम बांधवासाठी निरोप समारंभाचे आयोजन केले होेते. यामध्ये एकूण १३५ मुस्लिम बांधव हजसाठी रवाना होणार आहेत. त्यांना अनेक धर्मगुरु व मान्यवरांनी मार्गदर्शन केले.यावेळी राजमुहम्मद तांबोळी, अस्कर मिर्झा, सलीम इंजीनियर, मिर्झा रफअत बेग, डॉ. रहीमोद्दीन मुफ्ती कदीर तर प्रमुख पाहुणे म्हणून शल्यचिकित्सक किशोर श्रीवास, मंगेश टेहरे, गोपाल कदम, शेळके आदींची उपस्थिती होती. दरम्यान, शासनातर्फे हजयात्रेकरुना मास्तिष्क ज्वर लस, पोलीओ डोस देण्यात आला. तर हाफिज मु. सालार यांनी मार्गदर्शन केले. सुचत्रसंचालन मुसद मिर्झा यांनी केले. यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष इरफान वासेसा, हबीब बागवान, शफी गुत्तेदार, बाबूभाई, डॉ. जहिरोद्दीन, पठाण असगर, स. फरहान, शेख सलीम, टी. सी. मुसा सागर, जहीर ईटवाले आदींनी परिश्रम घेतले.
हज यात्रेकरूंचे हिंगोलीत लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 1:06 AM