शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

अर्ध्यावर शेतकरी विम्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 12:15 AM

जिल्ह्यात पीकविम्यासाठी शेवटच्या दिवशी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वच शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले. रात्री उशिरापर्यंत हे चित्र होते. तर राष्ट्रीयीकृत बँकांनीही आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत विमा स्वीकारला. मात्र हे प्रमाण तुरळक आहे. गेल्यावर्षी ३.५0 लाख शेतकºयांनी पीकविमा काढला होता. यंदा सव्वालाखही शेतकºयांचा विमा स्वीकारणे यंत्रणांना शक्य झाले नाही.

हिंगोली : जिल्ह्यात पीकविम्यासाठी शेवटच्या दिवशी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वच शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले. रात्री उशिरापर्यंत हे चित्र होते. तर राष्ट्रीयीकृत बँकांनीही आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत विमा स्वीकारला. मात्र हे प्रमाण तुरळक आहे. गेल्यावर्षी ३.५0 लाख शेतकºयांनी पीकविमा काढला होता. यंदा सव्वालाखही शेतकºयांचा विमा स्वीकारणे यंत्रणांना शक्य झाले नाही.हिंगोली जिल्ह्यात खरीप २0१५ हंगामात २ लाख ५८ हजार ३0९ शेतकºयांनी १ लाख ६0 हजार ५३३ हेक्टरवरील विविध पिकांचा विमा काढला होता. यात २.३४ लाख शेतकºयांना ११४.६८ कोटींची नुकसान भरपाई मंजूर झाली होती. तर २0१५-१६ च्या रबी हंगामात ३१ हजार शेतकºयांनी २५ हजार हेक्टर क्षेत्राचा विमा काढला होता. यात २७ हजार शेतकºयांना ९.६0 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली होती.यापैकी ६.५0 कोटींचे वाटप झाले. तर खरीप हंगाम २0१६-१७ साठी ३ लाख ५५ हजार १६६ शेतकºयांनी १.८५ लाख हेक्टरचा विमा काढला होता. ८५ हजार ७५ शेतकºयांना २८.५0 कोटींचा विमा मंजूर झाला होता. १३.७0 कोटींचे प्रत्यक्ष वाटप झाले.यंदा शेतकºयांचा पीकविमा भरण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. कर्ज घेणाºया शेतकºयांना त्यासोबतच विमा काढून मिळत आहे. असे सर्व बँकांचे २७ हजार ८७0 खातेदार २९ जुलैपर्यंत होते. यात आणखी हजार जणांची संख्या वाढू शकते. तर एकट्या मध्यवर्ती बँकेने २२२९४ जणांना पीककर्ज दिलेले आहे.आॅनलाईनवरही २१ जुलैपर्यंत १६ हजार शेतकºयांनी पीकविमा भरला होता. त्यानंतर रात्रंदिवस काम झाल्याने २0 हजारांपर्यंत नव्या शेतकºयांनी विमा काढला असण्याची शक्यता आहे. तर बँकांनी विमा स्वीकारण्याच्या सूचना दिल्यानंतर मध्यवर्ती बँकेने जवळपास ३५ ते ४0 हजार बिगर कर्जदार शेतकºयांचा विमा स्वीकारला असावा, असा अंदाज आहे. तर राष्ट्रीयीकृत बॅकांनी विमा स्वीकारल्याचा आकडा तर सोडा ही माहितीही द्यायला कुणी तयार नाही. मात्र हा आकडा दहा हजारांच्या पुढे जाईल, याची सुतराम शक्यता नाही.शेवटच्या दिवसापर्यंत महा-ई-सेवा केंद्रांना सर्व्हरच्या समस्येने मोठा त्रास सहन करावा लागला. तर बँकांना ऐनवेळी आदेश आल्याने केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकेवरच सर्व भार पडल्याचे चित्र होते.