दयाशील इंगोले । ९लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राज्यभरात २००९ पासून जिल्हास्तरावर एडस् प्रतिबंध व नियंत्रण कक्ष (डापकू) स्थापना करण्यात आली. एडस् जनजागृती व उपचार कामांचा आढावा वाढल्यामुळे तसेच वेळेत अद्यावत माहिती कळविणे, त्यावर नियंत्रण ठेवणे यासाठी ‘डापकूची’ स्थापना करण्यात आली होती. मात्र नॅको नवी दिल्ली यांनी आता डापकूतील जिल्हा सहायक लेखा व जिल्हा सहायक कार्यक्रम कर्मचारी अशी दोन पदे रिक्त करण्याचे ठरविले आहे. या संदर्भात नॅकोने त्यांच्या वेबसाइटवर मार्गदर्शीकाही प्रसारीत केली आहे. त्यामुळे राज्यभरातील ६० कर्मचा-यांवर टांगती तलवार आहे.एकीकडे केंद्रीय कर्मचा-यांना ७ वा वेतन आयोग लागू होत असताना या कार्यक्रमातील अधिकारी व कर्मचा-यांना कोणतेही वेतन वाढीचे ठोस नियोजन न करता पदामध्ये फेरबदल करून डापकू विभागातील दोन पदे कमी करण्याची मार्गदर्शिका ४ डिसेंबर रोजी नॅकोने वेबसाईटवर प्रसारित केली आहे. त्यामुळे कुठलीही सूचना अथवा पत्र व्यवहार कर्मचा-यांसोबत न करता डापकू टीमची दोन पदे कमी केली जात असल्यामुळे कर्मचा-यांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मागील दहा वर्षापासून अविरत सेवा दिलेल्या कर्मचा-यांच्या भवितव्याचा प्रश्न उभा आहे. अनेक वर्षांपासून सेवेत असल्यामुळे आता वयाचाही प्रश्न निर्माण झाल्याने इतरत्रही नोकरी हमी राहिली नाही.
राज्यातील डापकूच्या ६० कर्मचा-यांवर टांगती तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 1:13 AM