लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तालुक्यातील बोराळा व नांदुरा येथील विद्यार्थिनींना जवळा बु. येथे शाळेत जाण्यासाठी कोणतीच सोय नसल्याने त्यांची प्रचंड हेळसांड होत आहे. वारंवार मागणी करूनही बस सुरू होत नसल्याने या मुलींनी आज जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व आगारप्रमुखांची भेट घेवून त्यांना साकडे घातले.तालुक्यातील बोराळा, नांदुरा येथील ५0 ते ६0 मुली दररोज जवळा बु. येथील जयभारत विद्यालयात शिक्षणासाठी जातात. विविध वर्गात असलेल्या या मुलींना या गावाला जाण्यासाठी कोणतीच बस नाही. तर खाजगी वाहनेही मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना अनेकदा पायी जावे लागते. पाच ते सात किमी अंतर पायी तुडवत जाण्याची वेळ येते. त्यामुळे रोज सकाळी ८.३0 व सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास मानव विकासची बस या मार्गावरून सोडल्यास ही गैरसोय दूर होईल, असे निवेदनात म्हटले आहे. अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार यांना निवेदन दिले.
बसअभावी हिंगोली तालुक्यातील विद्यार्थिनींची हेळसांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 11:51 PM
तालुक्यातील बोराळा व नांदुरा येथील विद्यार्थिनींना जवळा बु. येथे शाळेत जाण्यासाठी कोणतीच सोय नसल्याने त्यांची प्रचंड हेळसांड होत आहे. वारंवार मागणी करूनही बस सुरू होत नसल्याने या मुलींनी आज जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व आगारप्रमुखांची भेट घेवून त्यांना साकडे घातले.
ठळक मुद्देजिल्हाधिका-यांना साकडे : मानव विकासची बस सुरू करा