शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?
2
"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं
3
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ग्रामीण भागात 'सुपरहिट'; कमला हॅरिस यांचे प्रयत्न कमी पडल्याची चिन्हे
4
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; तुमच्याकडे कारचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर...
5
रुपाली भोसलेने Bigg Boss मधील 'या' स्पर्धकाची केली कानउघाडणी; म्हणाली, "का हा ॲटिट्युड?"
6
कंगना रणौतचा डोनाल्ड ट्रम्प यांना सपोर्ट, म्हणाली- "मी अमेरिकन असती तर..."
7
Sunita Williams : सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत?
8
"आम्ही मुंब्राच काय, पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू", संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
9
सांगोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा की शेकापला साथ?
10
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
11
IPL मेगा लिलावात उतरलाय कोच; त्याच्यावर बोली लावत CSK 'सुपर कॉम्बो'चा डाव साधणार? की...
12
Tulsi Vivah 2024 यंदा तुळशीचे लग्न कधी? ‘अशी’ सुरु झाली परंपरा; पाहा, मान्यता अन् महत्त्व
13
Bank Locker Charges : 'या' सरकारी बँकांनी वाढवले बँक लॉकर चार्जेस; आता किती द्यावे लागतील पैसे; तुमचा लॉकर आहे का?
14
मराठमोळी अभिनेत्री दीप्ती देवीचं घटस्फोटावर पहिल्यांदाच भाष्य; म्हणाली, "आजही माझं त्यांच्यावर..."
15
"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे आत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल
16
"माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना"; पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख, धनंजय मुंडे काय बोलले?
17
मंगलदेशा, पवित्रदेशा, नातेवाइकांच्याही देशा..., कुटुंबकबिल्याच्या विळख्यात महाराष्ट्राचं राजकारण
18
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
19
वृश्चिक संक्रांती: ७ राशींना लाभच लाभ, सरकारी नोकरीचे योग; उत्पन्नात वाढ, पैशांची बचत शक्य!
20
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!

उन्हाचा पारा गेला ४0 अंशांच्या पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 12:10 AM

यंदा आधीच दुष्काळी स्थिती असून उन्हाचा पाराही मार्च महिन्यातच ४0 अंश सेल्सियसच्या पुढे गेला आहे. त्यामुळे बाष्पीभवनानेही जलसाठ्यांतील पाणी कमी होत असून दुसरीकडे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : यंदा आधीच दुष्काळी स्थिती असून उन्हाचा पाराही मार्च महिन्यातच ४0 अंश सेल्सियसच्या पुढे गेला आहे. त्यामुळे बाष्पीभवनानेही जलसाठ्यांतील पाणी कमी होत असून दुसरीकडे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे.यंदा पावसाने आॅगस्ट महिन्यापासूनच दगा दिला. या महिन्यात १९ आॅगस्टदरम्यान मोठ्या पावसाने हजेरी तर लावली. मात्र त्यानंतर सप्टेंबर, आॅक्टोबर पूर्णपणे कोरडे गेले. तरीही हिवाळ्याचा काळ मात्र लांबला होता. पार फेब्रुवारी महिन्यापर्यंत थंडीचा कडाका जाणवत होता. मार्चमध्ये वातावरण बदलले. हळूहळू सूर्य आग ओकत होता. आता ४0 अंश सेल्सियसच्या पुढे पारा सरकला आहे. दुपारच्या वेळी घराबाहेरही पडणे मुश्किल झाले आहे. त्याचा शेतीच्या कामांवरही परिणाम होत आहे. यंदा दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता लग्नसराई फारसी दिसत नाही. कदाचित निवडणुकांचाही परिणाम त्यावर झाला आहे. मात्र १८ एप्रिलला मतदान झाल्यानंतर प्रचारकार्य संपणार आहे. त्यानंतर लग्न समारंभांची रेलचेल वाढू शकते. परंतु टंचाईचा काळ लक्षात घेता अनेकांनी जानेवारी, फेब्रुवारीमध्येच विवाह सोहळे आटोपल्याचेही दिसत होते. त्यामुळे प्रवासातील या उन्हाच्या त्रासापासूनही वºहाडी मंडळींची मुक्तता करता आली.मे महिन्यात तर लग्न समारंभांना उन्हासह पाणीटंचाईचाही फटका सोसावा लागू शकतो. रबीचे पीकही घेता आले नाही.काही भागात आॅगस्टच्या पाण्यावरच तलाव भरले अन् त्यावर रबीचे पीक घेतले. मात्र इतरत्र वाळवंटासारखे ओसाड शेतशिवार आहेत.मजुरांचेही मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले आहे. लोकसभा निवडणुकीचा हंगाम सुरू झाला तरीही अजून हा मजूरवर्ग बाहेरच असल्याचे दिसत आहे.अनेक ठिकाणी सेवाभावी वृत्तीतून काही सामाजिक कार्य करणाऱ्या मंडळींनी पाणपोईची उभारणी केली असल्याचे दिसत आहे. या पाणपोईवर पूर्वीप्रमाणे आता माठ व पाणी वितरण करायला माणूस असे चित्र दिसत नाही. आता थंड पाण्याचे जार आणून ठेवले जात आहेत. काही ठिकाणीच जुन्या परंपरेप्रमाणे माठ आहेत. त्यात पाणी आणून टाकले जाते. मात्र जार ठेवणाऱ्यांना सरासरी २0 पेक्षा जास्त जार ठेवावे लागत आहेत. निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या दिवशी तर २0 जार दुपारीच संपले होते. पुन्हा तेवढेच मागण्याची वेळ आली होती.यंदाच्या उन्हाळ्यात सोसाट्याचा वारा व वावटळींचा मोठा त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच रस्त्यांची कामे सुरू असल्याने धुळीच्या लोटांनी जनता नैसर्गिक कारणानेच हैराण झाली आहे.

टॅग्स :Natureनिसर्गTemperatureतापमान