लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई/हिंगोली : गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. सोमवारी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात पाऊस झाला आहे. पुढील तीन दिवसात मराठवाड्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
धाराशिवमध्ये प्रतीक्षाच धाराशिव : पाच दिवसांपासूनच्या रिमझिम पावसामुळे खरीप हंगामातील तगलेल्या पिकांना जीवदान मिळाले असले तरी प्रकल्पांतील जलसाठा वाढण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. मागील २४ तासांत म्हणजेच सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात केवळ ४.३ मिलिमीटर पाऊस पडला. जिल्ह्यात एकही दमदार पाऊस पडलेला नाही.
या जिल्ह्यात हजेरी nनाशिक : जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, सोमवाही मुसळधार बरसला. nनांदेड : जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग. nबीड : सलग तिसऱ्या दिवशी पावची हजेरी. nहिंगोली : रविवारी रात्री अनेक भागात जोरदार पाऊस