लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : तालुक्यात सोमवारी दुपारनंतर जोरदार पावसाचे आगमन झाले. तालुक्यातील सर्व गावात जोरदार पावसाने हजेरी लावली असून पिकांना चांगला आधार मिळाला.वसमत तालुक्यात यावर्षी मध्यम स्वरूपाच्या पावसावरच पिके धरून आहेत. अधून - मधून होणारा पाऊस पिकांना जीवदान देत त्यावर पीक तग धरून आहेत. पाऊस कमी होऊनसुद्धा यावर्षी पीक चांगली आहे. जमिनीतील पाणीपातळी मात्र अजूनही वाढलेले नाही. धरणातही पाणी नाही. त्यामुळे परतीचा पाऊस तरी पाणी समस्या मिटवेल, अशी आशा आहे. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात परतीच्या पावसाने हजेरी लावणे सुरू केले आहे. शनिवारी पाऊस झाला होता. आता पुन्हा सोमवारी जोरदार पावसामुळे जमिनीतील पाणीपातळी वाढण्यास मदत होणार आहे.
वसमत परिसरात जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 11:59 PM