लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील रस्त्यांच्या द्विवार्षिक रस्ते देखभाल व दुरुस्ती निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाने काढल्या असल्या तरीही कंत्राटदार त्याकडे ढुंकूनही पहायला तयार नाहीत. जबाबदारीच जास्त अन् दर कमी झाल्याचे कंत्राटदारांचे म्हणने असून त्यामुळे एकप्रकारे त्यांनी बहिष्कारच टाकला आहे.जिल्ह्यातील ९ मार्गांच्या दुरुस्तीसाठी जवळपास २२ कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या . या निविदांना वारंवार मुदतवाढ देवूनही कोणी फिरकत नाही. मध्यंतरी सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी खड्डेमुक्त महाराष्ट्राची घोषणा केली होती. मात्र त्यात रेटा वापरून बांधकाम विभागाने काही खड्डेदुरुस्तीची कामे करून घेतली. तर रस्ता सुधारणा तथा द्विवार्षिक देखभालीच्या निविदांची १८ डिसेंबरची मुदत संपूनही कोणीच कंत्राटदार न फिरकल्याने पुन्हा २७ डिसेंबर ही मुदत दिली आहे. यावेळीही कंत्राटदार या निविदांसाठी कोणतेच प्रयत्न करताना दिसत नाहीत. आधीच डीएसआरचे दर घसरले. तर ही कामे केल्यास दोन वर्षांची दुरुस्ती तसेच आणखी एक वर्ष खड्डेदुरुस्ती हा आतबट्ट्याचा व्यवहार मानला जातोय.हे आहेत रस्ते : अशा आहेत निविदाहराळ-वरखेडा-केंद्रा-गोरेगाव- माळसेलू- माळहिवरा रस्ता २.५२ कोटी, वाई-बोल्डा प्रजिमा-२.५६ कोटी, साखरा-जयपूर-पानकनेरगाव- सावरखेडा-२.४७ कोटी,(रामा) २४९ ते येरंडेश्वर-रिधोरा-पळशी- बाभूळगाव- आसेगाव-रामा २५६ रस्ता-२.४८ कोटी, लोहरा-शिरडशहापूर-हयातनगर रस्ता २.५४ कोटी, हत्ता-उटी-केलसुला-कापडसिंगी ते जिल्हा सरहद्द-२.५0 कोटी, भानखेडा-वरूड चक्रपान-वेलतुरा रस्ता-२.५८ कोटी, वसमत-चुडावा-पूर्णा रस्ता-२.५१ कोटी, पेडगाव पाटील-चिंचोली-इसापूर-खानापूर-टाकळी-नांदापूर-२.५२ कोटी अशा निविदा आहेत.
रस्ते दुरुस्तीच्या निविदेस हिंगोलीत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 12:05 AM
जिल्ह्यातील रस्त्यांच्या द्विवार्षिक रस्ते देखभाल व दुरुस्ती निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाने काढल्या असल्या तरीही कंत्राटदार त्याकडे ढुंकूनही पहायला तयार नाहीत. जबाबदारीच जास्त अन् दर कमी झाल्याचे कंत्राटदारांचे म्हणने असून त्यामुळे एकप्रकारे त्यांनी बहिष्कारच टाकला आहे.
ठळक मुद्देसा.बां. हैराण : कंत्राटदारांचा बहिष्कार कायम