लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पालकांकडून मिळणाऱ्या ‘खाऊ’च्या पैशांतून गरजू विद्यार्थ्यांना उपयोगी साहित्य देण्याचा उपक्रम येथील सेक्रेड हार्ट इंग्लिश स्कूलच्या बालकांनी १२ आॅक्टोबर रोजी राबवीला.केंद्रात येणाºया गरीब बालकांना गरजेच्या शालेय साहित्यासाठी मदत करण्याची तयारी या विद्यार्थ्यांनी स्वत:हून दाखविली. चिमुकल्यांच्या या संकल्पाला सेक्रेड हार्ट स्कूलच्या प्राचार्या सिस्टर बास्किन यांनी होकार दिला. सदरील उपक्रमांतर्गत विद्यार्थी वाढदिवशी चॉकलेट, केक आदी खाऊंचे वाटप करण्याऐवजी ती रक्कम शाळेत असलेल्या पेटीत टाकतात. या पेटीत जमा रकमेतून प्रयासच्या बालकांसाठी गरजेचे साहित्य देण्याचे विद्यार्थी व प्राचार्यांनी ठरविले. यातून निघालेल्या ११ हजार रूपयांत तीन बालकांसाठी कॅलिपर्स बनवून घेण्यात आले. यासोबत शारीरिक व्यंग्य असलेल्या बालकांसाठी थेरेपी बॉलसुद्धा देण्यात आले. शुक्रवारी शुक्रवारी शाळेत झालेल्या कार्यक्रमात या वस्तूंचे वाटप झाले. वसंत भट्ट यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी सचिव गुंडेवार, रुकनोद्दीन शेख, प्रसाद राऊत आदींसह सेक्रेड हर्टचे शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
खाऊच्या पैशातून चिमुकल्यांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 12:16 AM